निर्दोष राहुल सलामे मृत्युच्या निषेधार्थ कँडल मार्च काढुन मृत्यु ची सखोल चौकशी करुन कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
अपराधीक प्रवृत्तीच्या लोकांसोबत असल्याच्या आरोप चुकीचा – कॉंग्रेस नेते नरेश बर्वे
कन्हान :-निर्दोष राहुल पंचम सलामे याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने अंतिम संस्कारा च्या दिवशी संतप्त आदिवासी समाज बांधव नागरिकांनी कन्हान पोलीस स्टेशन सामोर धरणा आंदोलन केल्याने कुटुंबांना आठ दिवसात न्याय देण्याचे लिखित आश्वसन उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी दिले होते .
परंतु नऊ , दहा दिवस होऊन सुध्दा कुठल्याही प्रकारची कारवाई आणि उत्तर पोलीस प्रशासना कडुन न मिळाल्याने संतप्त आदिवासी व नगरवासीयांनी सोमवार ला कँडल मार्च काढुन उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांना निवेदन देऊन मृत्यु ची सखोल चौकशी करुन तात्काळ कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे.
शनिवार (दि.४) फेब्रुवारी ला मध्यरात्री ३ वाजता कन्हान पोलीसांनी तपासाचा नावाने निर्दोष राहुल सलामे ला पोलीस स्टेशन ला घेऊन गेले आणि दुपार च्या वेळी त्याच्या कुटुंबाला पोलिसांनी निरोप पाठविला की त्याची प्रकृती बिघाडली आहे आणि त्याला उपचारा करिता दाखल केलं आहे .
पोलिसांनी त्याचा मानसिक शारीरिक छळ करुन त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा मेयो रुग्णालय नागपुर येथे उपचारा दरम्यान शुक्रवार (दि.१७) फेब्रुवारी ला राहुल पंचम सलामे याचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणुन पोलीसा विरुद्ध संताप व्यक्त करित अंतिम संस्काराच्या दिवशी रविवार (दि.१९) फेब्रुवारी ला रात्री माजी खासदार प्रकाश जाधव , नागपुर जिल्हा कॉग्रेस कमेटी उपाध्यक्ष नरेश बर्वे , प्रहार जनशक्ती संघटने चे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे , श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन केले.तेव्हा राहुल च्या कुटुंबांना सात दिवसात न्याय देण्याचे आश्वसन उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी दिले होते .
परंतु नऊ , दहा दिवस होऊन सुध्दा कुठल्याही प्रकारची कारवाई आणि उत्तर पोलीस प्रशासना कडुन न मिळाल्याने संतप्त आदिवासी बांधवांनी व नगरवासीयांनी सोमवार(दि.२७) फेब्रुवारी ला तारसा चौक , गांधी चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत कँडल मार्च काढुन उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांना निवेदन देऊन मृत्यु ची सखोल चौकशी करुन तात्काळ कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे .
अन्यथा निर्दोष राहुल सलामे चा मृत्यु ही नगरातील पहिला घटना असुन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यां ची मानव अधिकाराचे उल्लंघन करून पोलीस प्रशासन प्रकरण दाबण्याचा पर्यंत्न करित असल्याने जनमान सात पोलीसा विरूध्द चिड निर्माण होत उदभवणाऱ्या जनआंदोलनास पोलीसांना सामाना करावा लागेल आणि राहुल सलामे मृत्यु प्रकरणी न्याय मिळे पर्यंत गप्प बसणार नाही असा ईशारा निवेदन देऊन देण्यात आला आहे .
या प्रसंगी वडिल पंचम सलामे , आई रूपलता सलामे , पत्नी बबली सलामे , दिड वर्षाची मुलगी सह माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव , माजी मंत्री कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हा अध्यक्ष मा.राजेंद्र मुळक , उपाध्यक्ष नरेश बर्वे , गोंडवाना गणतंत्र पार्टी प्रदेश उपाध्यक्ष शुकलाल मडावी , जिल्हा उपाध्यक्ष रामलाल पट्टा, महासचिव गुड्ड भाऊ उईके , रामटेक तालुका संघटक राधेश्याम टेकाम , पारशिवनी तालुका संघटक राजेश टेकाम , शहर अध्यक्ष सोनु मसराम , गगन सीरसाम , रवी पंधरे , संदीप परते, सुरज वरखडे , राहुल टेकाम, समीर मेश्राम , माजी नप नराध्यक्षा अँड आशा पनिकर , रीता बर्वे , सुनिता मानकर , राखी परते , रेखा टोहणे , नगरसेवक मनिष भिवगडे , आकिब सिध्दीकी , सुत्तम मस्के , रंजनिश मेश्राम सह आदि आदिवासी समाज बांधव व नगरवासी मोठ्या संख्येत प्रामुख्याने उपस्थित होते .
“अपराधीक प्रवृत्तीच्या लोकांसोबत असल्याच्या आरोप चुकीचा – कॉंग्रेस नेते नरेश बर्वे”
कन्हान शहरात काही लोकांचा गैरसमज आहे की , शहरातील ग्रामीण भागातील काँग्रेस अपराधिक लोकांच्या सोबत असून त्यांना मदत करत आहे. पण मात्र आम्ही अपराधिक लोकांना पाठीशी घालत नसून पंचम सलामे यांचा मुलगा निर्दोष मृतक राहुल सलामे याची अपराधिक पार्श्वभूमी नसून निरपराध होता.
त्यामुळे त्याला न्याय देण्यासाठी आणि त्याचा घरच्यांना प्रशासना कडून मदत मिळण्याकरता आम्ही सोबत आहे . गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत कुठल्याही पद्धतीचा संवेदना नाही . लोकांमध्ये चुकीचा समज आहे ते त्यांनी डोक्यातून काढून टाकावे . जेणेकरून असा प्रसंग निर्दोष व्यक्तीच्या वाटेला जर की आला , आम्ही नेहमी अशा लोकांचा पाठीशी राहून नेहमी मदत करू असे नरेश बर्वे काँग्रेस उपाध्यक्ष ग्रामीण नागपूर यांनी सांगितले.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या