कन्हान येथे संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव थाटात साजरा : विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – श्री हनुमान, श्री गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमाने गजानन महाराज प्रकट दिवस महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
कन्हान शहरातील पांधन रोड, तिवाले ले-आऊट पांधन रोड कन्हान येथील श्री हनुमान , श्री गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सोमवार (दि.१३) फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता पुजापाठ, हवन, पुजन, आरती व दहिकाल्याचा कार्यक्रम करण्यात आला . त्यानंतर हभप श्री विजय सेलोकर महाराज आळंदीकर यांचा प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध झाले . दुपारी महाप्रसाद वितरण करून संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री हनुमान , श्री गजानन महाराज मंदिर पांधन रोड तिवाडे ले-ऑऊट आणि नवयुवक सेवा समिती पदाधिकारी, कार्यकर्ते सह भाविकांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या