नागपूर जबलपूर रोडवरील मौजा बोथिया पालोराच्या बसस्टॉप जवळील घटना कंटेनरची मोटार सायकलला मागुन धडक चालक गंभीर
रामटेक: मोटार सायकल चालकाच्या उजव्या हातावरून व उजव्या पायावरून कंटेनरचे चाक गेले, गंभीर जखमी कंटेनर मध्ये मोटार सायकल फसल्याने दूर पर्यंत मोटार सायकल ला कंटेनर ने नेले घासत
नागपूर जबलपूर रोडवरील मौजा बोथिया पालोराच्या बसस्टॉप जवळील घटना. नागपूर जबलपूर मार्गावरील मौजा बोथिया पालोराच्या बसस्टॉप जवळ दिनांक 27/02/2023 रोजी 5:00 वाजता घडलेल्या भिषण अपघातात मोटार सायकल चालकाच्या हातापायावरून सहाचाकी कंटेनरचे चाक गेल्याने गंभीर जखमी अवस्थेत देवलापार येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून मेडीकल नागपूरला उपचाराकरीता पाठविण्यात आले.
प्राप्त माहीती नुसार सुमारे 5 वाजताच्या दरम्यान मोटार सायकल क्र MH -40-CB – 6065 चा चालक नामे गणेश रामचंद्र उईके रा .बांद्रा हा मनसर कडून देवलापार मार्गे जात असता मौजा बोथिया पालोरा च्या बसस्टॉप समोर त्याच्या मागुन येणारा कंटेनर क्र. HR – 38 – AA – 5100. च्या चालकाने भरधाव व लापरवाहीने चालवून मोटार सायकल ला धड़क दिल्याने मोटार सायकल स्वाराच्या उजव्या हातावरून व पायावरून कंटेनरचे चाक गेल्याने गंभीर जखमी झाला. कंटेनर मध्ये मोटार सायकल फसल्याने काही अंतरापर्यंत मोटार सायकल ला घासत नेले.
दुर्घटनास्थळी हायवेची अॅम्बुलंस आल्याने जखमीस देवलापार च्या प्राथमिक रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढिल उपचारा करीता मेडीकल नागपुर ला पाठविण्यात आले. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी च्या बयानावरुन कंटेनर चालकाच्या विरुद्ध मोटार वाहन कानुन व भादवि अन्वये गुन्हा नोंद करून चालक हैदर खान वल्द सब्बन खान वय 21 वर्ष रा .परसोना .पोस्ट -पि .ए .सी .परसोनिया तह. चैनपुर जि. बरेली यास ताब्यात घेवुन पुढिल तपास पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे देवलापार च्या मार्गदर्शनात नापोशी विजय आर .बिसने करीत आहेत पुढाकार 24 करीता
प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम, मनसर-रामटेक
0 टिप्पण्या