Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल द्वारे! संत सेवालाल महाराज जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल द्वारे! संत सेवालाल महाराज जयंती साजरी

छत्रपती शिवाजी हायस्कूल देवरी येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी. स्थळ देवरी-दिनांक 15/02/2023 ला छत्रपती शिवाजी हायस्कूल देवरी येथे संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य एम.जी. भुरे, तर प्रमुख अतिथी पी एस खैरे हे होते.

प्रथम माॅ शारदा देवी व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या दिनाबद्दल सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना संत सेवालाल महाराज यांचे कार्य व त्यांनी समाजाप्रती केलेले कार्य यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगून मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.टी.मेश्राम सर यांनी केले तर सूत्रसंचालन कुमारी काजल निंबेकर हिने केले आभार प्रदर्शन कुमारी अलिशा कुंजाम हिने केले. या कार्यक्रमाला सर्व शालेय विद्यार्थी व शिक्षक प्रामुख्यानी उपस्थित होते.

प्रतिनिधी: जयंत डोंगरे, कामठी-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या