दहशत निर्माण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान -कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्गा वर शुक्रवार ला काही असामाजिक तत्वाच्या गुंडानी तलवार , काठी , राॅड , फिरवुन धुमाकुळ घालीत दहशत निर्माण करित सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी पोलीस हवालदार मुदस्सर जमाल यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला ११ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.३) फेब्रुवारी ला पोलीस हवालदार मुदस्सर जमाल हे पोलीस स्टेशन कन्हान येथे कर्तव्यावर हजर असतांना सांयकाळी ७:00 वाजता सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी पोलीस स्टेशन कन्हान येथे येऊन माहिती दिली की, नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वर स्वामी विवेकानंद नगर परिसरात आठवडी बाजारात काही असामाजिक तत्वाचा गुंडानी हातात लाठ्या काठ्या तलवारी घेवुन फिरत असुन बाजारात विक्री करिता आलेल्या दुकान दारांच्या मालाची नासधुरा व तोडफोड करित आहे. अशी माहिती प्राप्त होताच पोलीस हवालदार मुदस्सर जमाल यांनी घटनेची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले, पोलीस शिपाई शैलेश वराडे, आकाश सिरसाट, नविन पाटील यांना दिली असता पोलीसांनी खाजगी मोटर सायकल वर लगेच माहिती देणाऱ्या बरोबर आठवडी बाजारात गेले असता त्या ठिकाणी आरोपी १) खैलेश पंचम सलामे, २) शुभम सलामे, ३) गजानन कडनायके, ४) निखील उर्फ सन्नी गजभिये आणि तीन ते चार अनोळखी इसम हे हातात , तलवार, काठी, लोखंडी राॅड घेवुन आठवडी बाजारात विक्री करिता आलेले धान्य व भाजीपाला विक्री ते दुकानदार यांच्या भाजीपाला स्टॉलवर काठी, लोखंडी रॉड ने तोडफोड करत असल्याचे दिसुन आल्याने पोलीस हवालदार मुदस्सर जमाल यांनी आरोपी खैलेश सलामे यास मुख्य रसत्यावरून बाजुला करून ताब्यात घेतले.
तेवढ्यातच पो.स्टे.ला येऊन माहिती देणारे इसम हे गर्दीत कोठेतरी निघुन गेले. पोलीसांनी खैलेश सलामे यास ताब्यात घेतले म्हणुन त्याच्या साथीदारांनी फोन करून इतर साथीदारांना मोक्यावर बोलवुन घेतले व लगेच अनोळखी ७ ते ८ इसम व गजानन कडनायके, निखील उर्फ सन्नी गजभिये या इसमांनी मुदस्सर जमाल च्या ताब्यात असलेल्या खैलेश सलामे यास हिसकावुन घेवुन त्यांचे सोबत घेवुन गेले व मुदस्सर जमाल हे करित असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. मुदस्सर जमाल यांनी मोक्यावर हजर असले ल्या पोलीस स्टाफ सोबत त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाही. आरोपी १) खैलेश पंचम सलामे, २) शुभम पंचम सलामे, ३) निखील उर्फ सन्नी गजभि ये, ४) गजानन कडनायके व इतर अनोळखी ७ ते ८ आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमा करुन हातात काठी, तलवार, लोखंडी रॉड सारखे घातक शस्त्र घेवुन मा. जिल्हा दंडाधिकारी साहेब नागपुर यांनी नागपुर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासा ठी कलम ३७ (१) (३) मपोका, अन्वये पारित केलेल्या आदेशाच्या उल्लंघन करुन सर्वसामान्य नागरिकांना धमकाविले व मुदस्सर जमाल हे त्यांना थांबविण्या करिता करित असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी पोलीस हवालदार मुदस्सर जमाल यांच्या तक्रारीने पोस्टे ला आरोपी १) खैलेश पंचम सलामे, २) शुभम पंचम सलामे, ३) निखील उर्फ सन्नी गजभिये, ४) गजानन कडनायके व इतर अनोळखी साथीदार विरुद्ध कलम ३५३, ३२३, १४१, १४३, १४७, १४८, १४९ सह कलम ४२५ भाहका सहकलम १३५ मपो का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विशाल आनंद , अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा पथक व कन्हान पोलीस हे पुढील तपास करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
प्रतिनिधि – ॠषभ बावनकर,कन्हान-nagpur
0 टिप्पण्या