पारशिवनी तालुक्यातील आंगणवाड़ी सेविका व मदतनीस २०-फेब्रुवारी पासून संपावर
कन्हान – अंगणवाडी सेविका व मदतनीस (ता.२०) फेब्रुवारी पासून संप चालू असून (ता.२१) फेब्रुवारी रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारशिवनी कार्यालय समोर धरना आंदोलन केले. नवीन मोबाइल, थकीत पेंशन लवकरात लवकर काढणे, मानधनाच्या अर्धे पेन्शन रिटायरमेंट झाल्यावर देण्यात यावे, अशा आदि विविध हक्काच्या मागण्या घेऊन संप अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पुकारलेला आहे .
आयटक संघटने मार्फत आईसीडीएस कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व पारशिवनी तालुका आयटक संघटना अध्यक्ष सौ.सुनीता मानकर , संघटना सचिव उषा सहारे , दुर्गा मोडघरे , माया कटारे , सुनंदा ढोले , सुवर्णा शिंदे , शुभांगी खुरपडे , विजया मानकर , शीला मेश्राम , शीला सोनेकर , छाया गुंडाणे , सारिका कौशिक , शीला रायकवार सहारे , दुर्गा मोटघरे , माला ताई खोबरागडे , शिल्पा बडवाईक सह पारशिवनी तालुक्यातील १६४ आंगणवाड़ी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या