रामटेक शिक्षण विकास संस्था रामटेक द्वारा संचालित बाबा ताज इंग्लिश स्कूल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
मनसर/रामटेक:- रामटेक शिक्षण विकास संस्था रामटेक द्वारा संचालित बाबा ताज इंग्रजी प्राथमिक, माध्यमिक शाळा व सागर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय खुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. दिनांक 03/02/2023 ला क्रिडा स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन व दिपप्रज्वलन अखिल भारतीय ओ.बी.सी. बहुजन महासंघ राष्ट्रीय सचिव. डॉ. रावसाहेब झटाळे व रामटेक शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक बशीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
रामटेक शिक्षण विकास संस्थेचे सचिव बशीर शेख यांनी क्रिडा स्पर्धा प्रसंगी क्रिडा चे महत्व पटवून मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी मरीयम शेख (कोषाअध्यक्षा-रामटेक शिक्षण विकास संस्था ) ज्ञानेश्वर पौनीकर (सदस्य- रामटेक शिक्षण विकास संस्था), बाबा ताज कॉन्व्हेन्ट चे मुख्याध्यापक चंद्रशेखर डोणारकर, सागर एल. एम. डी. पी. चे प्रभारी प्राचार्य सेवकराम बागडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविका डोणारकर तर संचालन शिक्षिका सदफ पाशा व आभार प्रदर्शन स्विटी सोमकुवर यांनी केले.
उद्घाटनानंतर आयोजित क्रिडा स्पर्धा यात क्रिकेट, खो-खो कबड्डी, संगित खुर्ची, गोळा फेक, रनिंग इत्यादी खेळ विद्यार्थ्यांनी सादर केले. दिनांक 04/02/2023 दुसऱ्या दिवशी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात
विद्यार्थ्यांनी विविध नृत्य समुह, एकल नृत्य-नाटिका लावणी, गोंडी गित सादर केले. आयोजित बक्षीस वितरण अध्यक्षस्थानी बशीर शेख (सचिव-रामटेक शिक्षण विकास संस्था) तर प्रमुख अतिथी डॉ. रावसाहेब झटाळे (सचिव- अखील भारतीय ओ.बी.सी बहुजन महासंघ राष्ट्रीय) डॉ. सना शेख (वैद्यकीय अधिकारी- इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय, नागपूर ), तस्लीम शेख (उपाअध्यक्षा- रामटेक शिक्षण विकास संख्या) अक्रम शेख (सहसचिव-रामटेक शिक्षण विकास संस्था) मरियम शेख (कोषाअध्यक्षा-रामटेक शिक्षण विकास संस्था ) कमरूनिका शेख, चंद्रभान डोणारकर (पोलीस पाटील-भौदेवाडा) सुभान शेख, इरफान शेख, महेंद्र दमाहे, कृष्णकुमार पटले, रानीबाई हिरकने, ज्ञानेश्वर पौनीकर- चंद्रशेखर डोणारकर, सेवकराम बागडे आदी उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारोह प्रसगी रामटेक शिक्षण विकास संस्थेचे सचिन बशीर शेख यांनी शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल पालक वर्गाना समजावून सांगितले, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आनंदात कार्यक्रमात सहभागी होवून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यांच्यातील कलेचे प्रदर्शन पाहून पालक, परिसरातील प्रेक्षक आणि श्रोते ही आनंदी झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्तविक चंद्रशेखर डोणारकर, संचालन सदफ पाशा यांनी केले. आभार स्विटी सोमकुवर यांनी मानले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाटी मुख्याध्यापक चंद्रशेखर डोणारकर , प्रणय बागडे, दुर्गा ढोके, सदफ पाशा, नर्गिस पठान आसरा शेख, स्विटी सोमकुवर, करीश्मा उईके, कुंदा भरडे, गितीका बागडे आदीसह इतर सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रतिनिधी-प्रणय बागडे,मनसर माईन-रामटेक
0 टिप्पण्या