Advertisement

उपविभागीय पोलीस अधिकारी व थानेदारावर कारवाई करून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करा

कन्हान पोलीस स्टेशन हे नागपुर शहर पोलीस अंतर्गत समाविष्ट करण्याची मागणी

उपविभागीय पोलीस अधिकारी व थानेदारावर कारवाई करून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करा

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपा चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपा महिला आघाडीचे निवेदन

कन्हान  – कन्हान परिसरात समामाजिक तत्वाच्या काही गुंडानी साप्ताहिक बाजारा मध्ये लोकांना , दुकानदारांना व पोलीस कर्मचाऱ्याना मारहाण करून असोभनिय कृत्य केल्याचा निषेध करित जेव्हा पासुन उपविभागीय मुख्तार बागवान व कन्हान थानेदार विलास काळे यांनी पदभार सांभाळला तेव्हा पासुन कन्हान शहरात  जुआ , सट्टा , ताडी , एमडी , मादक पदार्थ विक्री , तलवारी निघने , धमकाविने प्रकार , कोळसा , रेती चोरी , असे अनेक प्रकारचे अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात शुरू झाले आहेत. या विषयी भाजपा तर्फे कितेकदा निवेदन दिल्यावर सुद्धा काही कार्यवाही झाली नाही.

कोराडी येथील जनता दरबारात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सौ प्रतीक्षा रिंकेश चवरे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन मागणी करण्यात आली की, अवैद्य धंदे बंद करावे व जेव्हा पासुन कन्हान ला उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान आणि थानेदार काळे आले तेव्हा पासुन का बर कन्हान येथे अवैद्य धंधे मध्ये वाढ झालेली आहे. याची गृह विभागा तर्फे चौकशी व चर्चा करून यांचे वर कडक कार्यवाही तात्काळ करावी. तसेच कन्हान पोलीस स्टेशन हे नागपुर शहर पोलीस अंतर्गत समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वाती पाठक,  भाजपा महीला आघाडी कन्हान शहर अध्यक्ष तुलेशा नानवटकर, महामंत्री सुष्मा मस्के, नगरसेविका अनिता पाटील, सुषमा चोपकर, वर्षा लोंढे, माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर, प्रतीक्षा चवरे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

| Take action against Sub Divisional Police Officer | and | Thanedar and appoint dutiful police officers |

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर,कन्हान-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या