Advertisement

ब्रेकिंग न्यूज तारसा जाॅईंट आरामशीन जवळ एका ईसमाची हत्या

ब्रेकिंग न्यूज तारसा जाॅईंट आरामशीन जवळ एका ईसमाची हत्या

मौदा – मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा जाईंट आरामशीन जवळ एका ईसमाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली आहे .

सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार आज शनिवार दिनांक ११ फ्रेब्रुवारी ला सकाळी च्या सुमारास तारसा जाईंट आरामशीन जवळ ईसम नामे भगवान राऊत वय अंदाजे ५५ यांची कोणीतरी अज्ञात ईसमांनी घातक धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली . हत्या चे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही

सदर घटनेची माहिती मौदा पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत खराबे हे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता मौदा रुग्णालय येथे नेण्यात आले .

सदर घटनेचा पुढील तपास मौदा पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या