Advertisement

रेती चोरीला अंकुश लावण्यास दंडात्मक कारवाई केली जाणार - तहसीलदार प्रशांत सांगळे

खंडाळा मार्गावर रेतीची अवैध वाहतुक करतांना महसुल विभागाने पकडले : कारवाई दरम्यान रेती सह ट्रक जप्त

रेती चोरीला अंकुश लावण्यास दंडात्मक कारवाई केली जाणार – तहसीलदार प्रशांत सांगळे

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा खंडाळा (घटाटे) मार्गावर महसुल विभाग पथकाचे तलाठी फरहान शेख यांनी क्षमते पेक्षा अधिक रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक ला पकडुन रेती सह ट्रक जप्त करुन ट्रक चालक व मालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.१३) ला दुपारी २.१५ वाजता दरम्यान मौजा खंडाळा (घटाटे) मार्गावरून रेतीची वाहतुक केली जात असल्याची गुप्त माहिती महसुल विभागाला मिळाली होती . या वरुन महसुल विभाग पथकाचे तलाठी फरहान शेख आपल्या अधिकाऱ्यांन सोबत खंडाळा मार्गावर उभे असतांना त्यांना ट्रक क्र. एम एच ४०बी जी – १६९२ ट्रॅक येताना दिसला .

त्या ट्रॅक ला थांबवुन पाहणी केली असता ट्रॅकच्या ट्रॉली मध्ये क्षमते पेक्षा अधिक रेती आढळुन येताच पथका च्या अधिकार्यांनी कागदपत्रांची तपासणी केली . तेव्हा रेती विना रॉयल्टी वाहतुक करित असल्याचे व क्षमते पेक्षा अधिक रेतीची अवैध वाहतुक असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी रेती सह ट्रॅक ताब्यात घेत जप्त केला व कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आला .

सदर प्रकरणी ट्रॅक चालक दुर्गा बोपचे रा.बिडगाव पारडी व मालक नरेंद्र शर्मा रा.नागपुर या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ ( ७ ) व ( ८ ) अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसुल विभाग प्रमुख तहसिलदार प्रशांत सांगळे आणि तलाठी फरहान शेख यांनी दिली. रेती चोरीवर अंकुश लावण्यास ट्रक चालक व मालक यांचे वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या