बाईक रैली काढुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
कन्हान – वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती मोठया उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम तुकाराम महाराज मंदिरात पुजा पाठ करुन वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकार्यांनी तालुका वरिष्ठ पदधिकारी चंद्रमणी पाटील यांचा नेतृत्वात बाईक रैली काढून विविध मार्गाने भ्रमण करुन डॉ.आंबेडकर चौक येथे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याला माल्यार्पण करून जय घोष देत शिवाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला माल्यार्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो चा जयघोष दिला.
यावेळी निशांत मोटघरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन रजनीश मेश्राम यांनी केले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर नितेश मेश्राम , मनोज गोंडाने , सुशील कळमकर , अविनाश नागदेवे , रजनीश मेश्राम , सागर उके , सतीश ढबाले , योगेश मोहड , मनीष शंभरकर , राजेश सोमकुवर , सोनू खोब्रागडे , रितिक कापसे , रोहित राय , आदित्य टेभूरणे , नवीन सहारे , अजय गाणार , विनय बागडे , सह आदि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या