Advertisement

शिवसेना रामटेक विधानसभा सहसंपर्क प्रमुख पदी पुरुषोत्तम मस्के यांची नियुक्ती

शिवसेना रामटेक विधानसभा सहसंपर्क प्रमुख पदी पुरुषोत्तम मस्के यांची नियुक्ती

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान  – शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना नागपुर जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांच्या सहमतीने रामटेक विधानसभा सहसंपर्क प्रमुख पदी पुरुषोत्तम मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख मा.देवेंद्र गोडबोले, रामटेक विधानसभा प्रमुख नेते विशाल बरबटे, पारशिवनी शिवसेना तालुका प्रमुख कैलाश खंडार यांच्या हस्ते पुरुषोत्तम मस्के यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रामटेक विधानसभा सहसंपर्क प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देऊन व मिठाई चारून अभिनंदन करण्यात आले .

या प्रसंगी नगरसेवक शिवराज माथुरकर , शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदीप निम्बारते , युवा सेना शहर प्रमुख जितु साठवणे , अमन अरोरा , युवासेना शहर प्रमुख सतिश वराड़े , भारत पाटील सह  पदाधिकारी व शिवसैनिकानी प्रामुख्याने उपस्थित राहुन पुरूषोत्तम मस्के चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस आणि पक्ष मजबुती करिता शिव शुभेच्छा देण्यात आल्या . या नियुक्ती करिता शिवसेना माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले सह सर्व पदाधिकाऱ्यांचे पुरूषोत्तम मस्के हयांनी आभार व्यकत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या