चारपदरी महामार्गा वर डुमरी नवीन पुलिया समोर दोन दुचाकी वाहनात भिषण अपघात
एक महिला गंभीर जख्मी , पोस्टे ला एव्हेंजर वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वर डुमरी नवीन पुलिया समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एव्हेंजर दुचाकी वाहन चालकाने मोपेड गाडीला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी रमेश ऊईके यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला एव्हेंजर दुचाकी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी रमेश महादेवराव ऊईके वय ५२ वर्ष रा.रमटेक हे मंगळवार दिनांक ७ फ्रेब्रुवारी ला रात्री ८ वाजता च्या दरम्यान आपल्या घरी हजर असतांना त्यांना जे. एन. हॉस्पीटल कांद्री येथून फोन आला व त्यांनी रमेश ला सांगीतले की तुमची पत्नी नाम माधुरी उईके हिचा अपघात झाला आहे. त्यांना जे. एन. हॉस्पीटल कांद्री येथे उपचार कामी भर्ती केले आहे . अश्या माहिती वरुन रमेश चुके हे आपल्या मित्र नामे उद्धव सोयाम यांना हकीकत सांगुन त्याच्या सोबत जे. एन. हॉस्पीटल कांद्री कडे येत असतांना रमेश यांना जे.एन. हॉस्पीटल चे अॅम्बुलेंस चालक यांचा फोन आला व त्यांनी रमेश ला सांगीतले की तुमच्या पत्नी ला जास्त मार लागला असल्याने मी त्यांना चौधरी हॉस्पीटल कामठी येथे घेवून जात आहे असे सांगितल्या वरून रमेश व त्यांचा मित्र चौधरी हॉस्पीटल कामठी येथे पोहचले असता रमेश यांच्या पत्नीचा उपचार सुरु होता व ती बेशुध्द अवस्थेत होती .
बुधवार दिनांक ८ रोजी सकाळी ८ वाजता च्या दरम्यान रमेश यांची पत्नी ही शुध्दीवर आल्यानंतर रमेश यांनी आपल्या पत्नीला अपघाता बाबत विचारले असता तिने सांगीतले की , मी मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी ला माझा ऑफीस चे काम संपवुन माझी मोपेड गाडी क्रमांक एम.एच. ४० ए.एच. ७७६४ ने रामटेक येथे घरी परत येत असतांना रात्री ७४५ वाजता च्या दरम्यान डुमरी नवीन पुलीया च्या समोर विरुद्ध दिशेन येणारी एव्हेंजर दुचाकी वाहन क्रमांक एम.एच. ४०. ए. वाय. ६४८९ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन माझ्या मोपेड गाडीला समोरून धडक दिल्याने मी गाडीवरुन खाली पडल्याने माझ्या डाव्या पाय फ्रेंक्चर झाला असुन कान फुटला व खांद्याला मुका मार लागला असे सांगितल्या ने रमेश ऊईके यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला एव्हेंजर दुचाकी वाहन चालका विरुद्ध तक्रार दिल्याने पोलीसांनी एव्हेंजर दुचाकी वाहन चालका विरुद्ध कलम २७९ , ३३७ , ३३८ भांदवि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार आतिश मानवटकर हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या