कन्हान , कांद्री येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन
आज कांद्री येथे पालखी यात्रेचे चे आयोजन
कन्हान – कन्हान कांद्री परिसरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन आज कांद्री येथे पालखी यात्रेची मिरवणुक काढण्यात येणार आहे .
श्री गजानन महाराज मंदिर , कन्हान
कन्हान शहरातील तिवाले ले आऊट पांधन रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . उद्या सोमवार दिनांक १३ फ्रेब्रुवारी ला सकाळी ९०० वाजता पुजापाठ , महाआरती हवन , दहिकाला कार्यक्रम होणार आहे . तसेच सकाळी १०३० वाजता भव्यदिव्य किर्तनाचा कार्यक्रम श्री ह.भ.प.विजय सेलोकर महाराज आळंदीकर यांचे प्रबोधन कार्यक्रम होणार आणि दुपारी १२३० वाजता महाप्रसाद वितरण करुन कार्यक्रम संपन्न करण्यात येणार आहे . ह्या कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आव्हाहन श्री गजानन महाराज मंदिर , नवयुवक सेवा समिती द्वारे करण्यात आले आहे .
कांद्री येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
कांद्री येथे स्वर्ग श्री सोमाजी गिऱ्हे यांच्या शेतातील श्री संत गजानन महाराज मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज रविवार दिनांक १२ फेब्रुवारी ला सायंकाळी ५०० वाजता वार्ड क्रमांक तीन हनुमान मंदिर येथुन विधिवत पूजा पाठ करुन पालखी यात्रा काढुन विविध मार्गाने भ्रमण करीत पालखी यात्रेचे समापन वार्ड क्रमांक पाच येथील सोमाजी गिऱ्हे यांच्या शेतातील श्री संत गजानन महाराज मंदिरात करण्यात येणार आहे . उद्या सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी ला श्री संत गजानन महाराज मंदिरात सकाळी पुजा पाठ करुन श्री संत गजानन भजन मंडळ द्वारे भजन कीर्तन कार्यक्रमाची सुरूवात होईल , दुपारी २०० वाजता गोपालकाला आणि दहीहंडी चा कार्यक्रम होईल आणि सायंकाळी ५३० वाजता पासुन महाप्रसाद कार्यक्रम सुरु होईल . तरी गावकऱ्यांनी ह्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हाहन श्री संत गजानन महाराज मंदिर कमेटी द्वारे करण्यात आले आहे .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या