Advertisement

उभ्या ट्रक मधुन ३९० लीटर डिजेल अज्ञात चोरट्यांनी केले चोरी

उभ्या ट्रक मधुन ३९० लीटर डिजेल अज्ञात चोरट्यांनी केले चोरी

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील डुमरी खुर्द येथे उभ्या ट्रक मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ३९० लीटर डिजेल चोरी करुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी नागराज सत्ती यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक ३० जानेवारी ला रात्री १० वाजता च्या दरम्यान फिर्यादी नागराज व्यकंटरेड्डी सत्ती , वय ३२ वर्ष रा.डुमरी खुर्द (अन्ना मोड) कन्हान हे आपल्या घरी जेवन करुन झोपले होते . दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक ३१ जानेवारी ला सकाळी ५ ते ५३० वाजता च्या दरम्यान नागराज सत्ती झोपुन उठले तेव्हा त्यांचे घरा समोरील सर्व्हिस रोडवर असलेल्या ट्रक कडे लक्ष गेले . तेव्हा नागराज सत्ती यांना ट्रक च्या डिजेल टैंक चे झाकन तुटलेला दिसला आणि ट्रक च्या खाली जमीनी वर डिजेल पडण्याचा खुणा दिसल्याने नागराज यांनी ट्रक च्या डिजेल टैंक ची तपासणी केली असता नागराज यांना ट्रक चे डिजेल चोरी झाल्याचे दिसले.

कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सोमवार दिनांक ३० जानेवारी चे रात्री १० वाजता ते मंगळवार दिनांक ३१ जानेवारी ला सकाळी ५ ते ५३० वाजता च्या दरम्यान नागराज सत्ती यांचा ट्रक च्या डिजेल टैंक ज्याची कॅपेसिटी ४२० लीटर डिजेल चे आहे . त्याचा मधुन अंदाजे ३९० लीटर डिजेल किंमत ३७४४० रुपयाचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नागराज सत्ती यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रमांक ४९२३ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शना पोलीस उप निरीक्षक सुर्यभान जळते हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

| Unknown | thieves stole | 390 liters of diesel | from a standing truck |

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या