अमानुषपणे मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर नीलंबनावर न थांबता कठोर कारवाई करावी: ग्रामस्थांची मागणी
हदगाव-नांदेड: निस्वार्थ गो सेवा करणाऱ्या सेवकावर अमानुषपणे मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर नीलंबनावर न थांबता कठोर कारवाई करावी.
भोकर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी हदगाव पोलीस स्टेशन येथे आले असता, सामाजिक कार्यकर्त्या व तसेच पत्रकार शितल भांगे पाटील, यांनी निस्वार्थ गो सेवा करणारा सेवकावर अमानुषपणे मारहाण करणाऱ्या इस्लापूर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्यावर विभागीय चौकशी लावून कठोर कारवाई करण्यात यावी. असे निवेदन पोलीस स्टेशन हदगाव, उपविभागीय अधिकारी हदगाव, तहसील कार्यालय हदगाव, इत्यादी ठिकाणी निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी लावून कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शितल भांगे पाटील, दुर्गा भारती, संतोष देवकर, सचिन पाटील कामारकर, विश्वजित पाटील पवार, शिवाजी पाटील जाधव, प्रमोद पाटील कोथळकर, संदीप आढाव सचिन पाटील जाधव इत्यादी प्रामुख्यानी उपस्थित होते.
प्रतिनिधी: तुकाराम चव्हाण, हदगाव-नांदेड
0 टिप्पण्या