शेतात बांधुन ठेवलेल्या ७० गोवंश ला कन्हान पोलीसांनी दिले जीवनदान :कारवाई दरम्यान ७० गोवंश सह एकुण ६,५६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सिहोरा शिवारात गोपाल नथ्थुजी कुंभलकर यांचा शेतात ७० गोवंश मिळुन आल्याने पोलीसांनी एकुण ६,५६,००० रु. मुद्देमाल जप्त करुन गोवंश ला जीवनदान देऊन कन्हान पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी ला दुपारी १:३० ते रात्री ११:३४ वाजता च्या दरम्यान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे, अश्विन गजभिए , महेंद्र जळीतकर , संदीप गेडाम सह आदि कर्मचारी परिसरात प्रोव्हीशन व जुगार रेड करने कामी सरकारी वाहना ने रवाना झाले होते.
पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की सिहोरा शिवारात गोपाल नथ्थुजी कुंभलकर रा. तुकाराम नगर कन्हान यांच्या शेतात आरोपी जिया कुरेशी एहेसान कुरैशी रा.कामठी याने कत्तलीकरीता अवैधरित्या गोवंश बांधुन ठेवलेले आहेत.
अश्या विश्वसनीय माहिती वरुन कन्हान पोलीसांनी स्टाॅप सह सिहोरा शिवारात गोपाल कुंभलकर यांचा शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांचे शेतात झाडी झुडपा मध्ये गोवंश जातीचे
(१) ११ लहान गोरे लाल काळ्या रंगाचे प्रत्येकी किंमत ६,००० रु प्रमाणे एकूण ६६,००० रु .
(२) ११ गायी लाल काळ्या पांढऱ्या रंगाचा प्रत्येकी किंमत १०,००० रु. प्रमाणे एकुण १,१०,००० रू.
(३) ४८ मोठे गोरे व बैल लाल काळ्या पांढऱ्या रंगाचे प्रत्येकी किंमत १०,००० रु प्रमाणे एकुण किंमत ४,८०,००० असा एकुण ६,५६,००० रुपयांचे गोवंश जातीचे गोरे, बैल, मिळुन आले व गायींना निर्दय व क्रुरणने चारा पाण्याची व्यवस्था न कत्लीकरीता बांधलेले दिसुन आले.
सदर घटनास्थळी शेतमालक गोपाल कुंभलकर आणि गोवंश मालक जिया कुरेशी मिळुन आले नाही. कन्हान पोलीसांनी पंचासमक्ष ७० गोवंश ला ताब्यात घेऊन सदर गोवंशाचे पालन पोषण करण्याकरिता ज्ञान फाऊंडेशन गौशाला बरडगिनी येथे दाखल करण्यात आले आहे .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी पोशि अश्विन मधुकर गजभिए यांचा तक्रारी वरून पो.स्टे. ला आरोपी १) गोपाल कुंभलकर २) जिया कुरेशी एहेसान कुरैशी यांचा विरुद्ध कलम प्रान्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियन ११ (१) (ड), महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम ९,२,५अ अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे , अश्विन गजभिए हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.


0 टिप्पण्या