Advertisement

पीकअप वाहना मध्ये दोन गौवंश ला कत्तलीकरिता घेऊन जातांना कन्हान पोलीसांनी पकडले

पीकअप वाहना मध्ये दोन गौवंश ला कत्तलीकरिता घेऊन जातांना कन्हान पोलीसांनी पकडले

कारवाई दरम्यान दोन गोवंश आणि वाहना सह एकुण ८,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त , एक आरोपी अटक

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी शिवारात गोंडेगाव रोडवर पीकअप वाहना मध्ये दोन गौवंश ला कत्तलीकरिता घेऊन जातांना कन्हान पोलीसांनी पकडुन एका आरोपी ला ताब्यात घेऊन त्याचा जवळुन दोन गोवंश आणि वाहना सह एकुण ८,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार आणि गुरुवार दिनांक ९ फ्रेब्रुवारी ला रात्री १ ते १३० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक फौजदार गणेश पाल , पो.शि दिपक कश्यप हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि डुमरी शिवारात गोंडेगाव रोडवर एक पीकअप वाहन क्रमांक एम एच-३०-बीडी-१५४७ दोन गौवंश ला कत्तलीकरिता घेऊन जात आहे . अश्या माहिती वरुन सहायक फौजदार गणेश पाल , पो.शि दिपक कश्यप हे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी पोहचले असता गोंडेगाव रोडवर एक पीकअप वाहन क्रमांक एम एच-३०-बीडी-१५४७ दिसली .

त्यास पोलीसांनी थांबवुन वाहनाची पाहणी केली असता वाहनात २ गोवंश त्याचे पाय व तोंड बांधुन बिनाचारा पाणी निर्दयतेने कत्लीकरीता घेवुन जातांनी मिळून आल्याने पोलीसांनी चालक आरोपी शेख सोहेल शेख ईस्माईल वय ३० वर्ष रा.भाजीमंडी कामठी यास ताब्यात घेऊन त्याचा जवळुन एक गाय व गोरा एकुण किंमत ५०,०००- रु., वाहनाची किंमत ८००,०००- रु असा एकूण ८,५०,०००- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला सरकार तर्फे फिर्यादी दिपक रामचंद्र कश्यप यांच्या तक्रारी वरून आरोपी शेख सोहेल शेख ईस्माईल विरुद्ध अप.क्र. कलम ६०२३ कलम (१) ड प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याच्या कायदा १९६० सहकलम ३(१) (२).९ महा प्राणी सुरक्षा अधि १९९५ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार गणेश पाल हे करीत आहे .

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या