Advertisement

कन्हान शहर युवक कांग्रेस द्वारे शहिदांना दिली श्रद्धांजली

कन्हान शहर युवक कांग्रेस द्वारे शहिदांना दिली श्रद्धांजली

कन्हान : जम्मु-कश्मीर मधील पुलवामा मध्ये १४-फेब्रुवारी-२०१९ रोजी भारतीय जवानांवर दहशतवाधी हल्ला केला असता, या हल्ल्यात सीआरपीएफ चे ४०-जवान शहीद झाल्याने संपुर्ण देश हादरले होते.

हल्ल्याला चार वर्ष पुर्ण झाले असता कन्हान युवा कॉंग्रेस तर्फे शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले.

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान शहर युवक कांग्रेस अध्यक्ष आकिब सिद्दिकी यांच्या हस्ते शहिद स्मारका वर पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी युवक कांग्रेस च्या पदाधिकार्यांनी व सदस्यांनी शहिद स्मारका वर पुष्प अर्पित व मौन धारण करुन पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

या प्रसंगी कन्हान-पिपरी नगर परिषद नगरसेविका सौ.रेखा टोहने, आंनद चकोले, अनस शेख, सुनील अंबागडे,  अरशीद शेख, अतुल मानकर, साहिल खान, विवेक उम्रकर, आकाश देवुडकर, अक्षय यादव, शंकर ढोके सह आदि कांग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या