येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे शासकिय योजनाचे शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न
एकुण ५० लाभार्थ्यांनी घेतला शिबीराचा लाभ
कन्हान – येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे शिबीराचे आयो जन करून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना, श्रम कार्ड योजना, नविन राशन कार्ड बनविणे, राशनकार्ड मधुन नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, राशनकार्ड ऑनलाईन करणे आदी चा नागरिकांना लाभ देण्यात आला .
सोमवार (दि.६ ) फेब्रुवारी ला येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजना , श्रावण बाळ निराधार योजना, श्रम कार्ड योजना, नविन राशन कार्ड बनविणे, राशनकार्ड मधुन नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, राशनकार्ड ऑनलाईन करणे, या सर्व योजनांचे शिबीर सरपंचा कु.सोनु वासुदेव इरपाते आणि उपसरपंच धनराज हारोडे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच रामटेक क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या सौजन्याने शिबिर राबविण्यात आले .
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.नंदाताई लोहबरे , शिवसेना मौदा तालुका प्रमुख मा. नितेश वांगे आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर राबविण्यात आले. या शिबिरा मध्ये ५० पेक्षा जास्त लाभार्थ्यानी सहभाग होऊन लाभ घेतला.
The camp program of the government scheme was concluded at the Yesamba Gram Panchayat Office yesanba grampanchayt yethe shakiy yojnanche shivir sampnna
प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान


0 टिप्पण्या