ब्रेकिंग न्यूज आमडी येथिल खळबळ जनक घटना कुऱ्हाडीने केली पत्नीची हत्या!
आमडी येथे पत्नीच्या हत्येनंतर पतीची आत्महत्या
रामटेक: रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील आमडी येथे पतीने आपल्या पत्नीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दि. १७ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आला.
मृतक मधूकर इनवाते (वय 53 वर्ष) व पत्नी कुसुम मधुकर इनवाते (वय 45 वर्ष), दोन्ही राहणार सौसर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून हल्ली मुक्काम आमडी ता.पारशिवनी असे आहे. मृतक आमडी येथील रहिवासी चैतराम बसोले यांच्याकडे गुरे (जनावरे) चारण्याचे काम करायचा.
प्राप्त माहितीनुसार,मृतकाला दारूचे व्यसन होते,दारू पिऊन नेहमी पत्नीसोबत भांडण होत होते.सततच्या भांडणाला कंटाळून त्याची पत्नी आपल्या मुलाकडे कोथुळणा ता.सावनेर येथे राहायची.घटनेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पत्नी आपल्या पतिकडे आली होती.
याच वेळी दारू पिऊन पती-पत्नीत भांडण झाले आणि रागाच्या भरात पतीने कुऱ्हाडीने पत्नीवर वार करून ठार केले व पत्नीला ठार करून कुऱ्हाड घराजवळील तलावाजवळ फेकून शेवटी स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली.असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
ही संपूर्ण घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती (दि.१७ फेब्रुवारी) सकाळी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली.घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली.रामटेक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आतिष कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक यादव घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतकांना शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले आहे.
हत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत.
प्रतिनिधी: पंकज चौधरी रामटेक.
0 टिप्पण्या