Advertisement

धर्मराज शैक्षणिक परिसरात दोन दिवसीय आधार कार्ड अपडेट शिबिर संपन्न

धर्मराज शैक्षणिक परिसरात दोन दिवसीय आधार कार्ड अपडेट शिबिर संपन्न

कन्हान – कांद्री – कन्हान येथील धर्मराज शैक्षणिक परिसरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड अपडेट दोन दिवसीय शिबिर कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आले .

या आधारकार्ड शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी ला धर्मराज विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. रमेश साखरकर , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. खिमेश बढिये व आधार केंद्र संचालक मा.सतीश भसारकर यांच्या हस्ते करण्यात आले .

या शिबिरात ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट , नाव , जन्मतारीख व पत्ता दुरुस्ती , लिंग दुरुस्ती , नवीन आधारकार्ड या संदर्भातील कामे करण्यात आले . शालेय प्रवेश व आॅनलाईन कामासाठी आधारकार्ड अपडेट नसल्याने बऱ्याच अडचणी येत होत्या. या अडचणी सोडविण्यासाठी व पालकांच्या आग्रहास्तव या शिबिराचे शालेय प्रशासना द्वारे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले . बुधवार (दि.१५) व गुरुवार (दि.१६) या दोन दिवसीय शिबिराचा धर्मराज शैक्षणिक विद्यार्थांनी आणि विद्यार्थींनी मोठ्या संख्येत लाभ घेतला असुन विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट साठी आधार केंद्र संचालक मा.सतीश भसारकर , संगणक आॅपरेटर मा.सुमीत घोरपडे यांनी सहकार्य केले .

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या