Advertisement

कन्हान बुद्ध विहारात त्यागमूर्ति रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

कन्हान बुद्ध विहारात त्यागमूर्ति रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

कन्हान-बुद्ध विहार,सिद्धार्थ कॉलोनी,गणेश नगर,कन्हान येथे त्यागमूर्ति माता रमाबाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमात प्रामुख्याने भदंत के सी यस लामा यांच्या हस्ते त्यागमूर्ति माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी भन्तेजी यांनी परित्राणपाठ करून प्रवचन केले आणि या प्रसंगी पिंकी मेश्राम,सारिका धारगावे आणि इतर गणमान्य यानी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . जयंती प्रीत्यर्थ सिंधुताई वाघमारे यांनी रमाई गीत सादर केले ,कार्यक्रमात उपस्थित सर्व उपासक उपासिकांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मिठाई अल्पोहार वितरित करण्यात आले.

या प्रसंगी शीलाताई बागडे , सत्यभामाबाई वाघमारे , चौहान ताई , रजनी कुंभारे , फुलवतीबाई उके , सूर्यप्रभाबाई ढोके , तांबे ताई , पिकु वंजारी , पुंडलिक मानवटकर , शिलाताई मानवटकर , जयाताई वाघमारे , चौरे ताई , सूर्यभानजी ढोके , शर्वरी रंगारी , अमिता दहीवलकर , पानतावणे साहेब ,धारगावे साहेब , वैशाली कुंभारे , गीताताई पौनीकर , सुजाता नितनवरे , कल्पना फुलझेले , प्रभा गजभिये , मायाताई मेश्राम , अन्नपूर्णाबाई गजभिये , सविताताई रंगारी , रजनीताई पाटील , सत्यफुला मेश्राम , कुसूम वाघमारे , आस्मिता डोंगरे , ललिताताई धनविजय , कराडे ताई , सुषमाताई बारमाटे , कमलाताई गटपाडे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान nagpur

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या