Advertisement

रमाई सार्वजनिक ग्रंथालय कन्हान माई रमाई यांची १२५ वी जयंती साजरी

रमाई सार्वजनिक ग्रंथालय कन्हान माई रमाई यांची १२५ वी जयंती साजरी

कन्हान  – रमाई सार्वजनिक ग्रंथालय कन्हान येथे त्यागमृर्ती माई रमाई यांची १२५ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली. मंगळवार (दि.७) फेब्रुवारी २०२३ ला रमाई सार्वजनिक ग्रंथालय कन्हान येथे आयु.सखाराम मंडपे यांचे अध्यक्षतेत त्यागमुर्ती माता रमाई यांची १२५ वी जयंती निमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व माई रमाई यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी आयु सखाराम मंडपे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना थोर महापुरुष होण्या करिता माई रमाई यांचे योगदान किती मोलाचे ठरले , जीवनात संघर्ष म्हणजे काय त्याचे खरे उदारहण रमाई हे आहेत. ४ मुले मृत पावले तरी त्या खचल्या नाही , बाबासाहेबांना समाज कार्यात नेहमी त्यांच्या पाठीशी खंभीर उभ्या राहिल्यात त्याच्या संघर्षमय जीवनातुनच बाबासाहेब हे खंबिर नेतृत्व निर्माण करू शकले.

या प्रसंगी राजेश गणविर , मालाताई मंडपे , मन भांदक्कर , जया इनवाते , चांदणी रामटेके , मयुरी भोयर , मोहित डोंगरे , दीपा शर्मा , शिल्पा पाटील सह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कु.गाथा राऊत आणि प्रफुल मोरे यांनी परिश्रम घेतले.

Ramai Public Library Celebrates 125th Birth Anniversary of Kanhan Mai Ramai

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या