दुचाकी चालकांचे नियंत्रण सुटल्याने! विद्युत डिपी लोखंडी खांबाला धडक, लागुन भयंकर अपघात
अपघातात एका युवकाचा मृत्यु , तर दुसरा जख्मी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलास स्टेशन अंतर्गत वराडा गावच्या रोड वर गावातील मित्राच्या वडीलांचा जेवनाचा डब्बा कंपनीत पोहचुन दुचाकी वाहना ने घरी परत जातांना सामोरून आलेल्या वाहनाच्या तिव्र प्रकाशाने रस्त्यावर अचानक जनावर आडवे आल्याने दुचाकी चालकांचे नियंत्रण सुटुन रस्त्या लगत असलेल्या विद्युत डिपी मध्ये दुचाकी घुसुन झालेल्या अपघातात आकाश कोटे याचा मृत्यु झाला तर अक्षय वरखडे गंभीर जख्मी झाल्याने त्याचा कामठी खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.१३) फेब्रुवारी ला रात्री ८ वाजता दरम्यान अक्षय सुरेश वरखडे वय १८ वर्ष व आकाश मुलचंद कोटे वय २० वर्ष दोन्ही राह. वराडा हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वराडा येथे बसले असता गावातील मित्र प्रतिक ऊईके यांने येऊन अक्षय ला म्हटले की मला महत्वाचे काम असल्याने तु आकाश सोबत त्याच्या दुचाकीने माझ्या वडीलांचा जेवनाचा डब्बा एमएचकेएस पेट्रोल पंप समोरील स्टाईल कंपनीत देऊन ये असे सांगितल्याने आकाश कोटे च्या मोटार साईकल स्प्लेंडर क्र.एमएच ४०-सीबी ८४८७ ने जेवनाचा डब्बा त्यांच्या वडिलांच्या कामावर देऊन वराडा येथे घरी परत येत असतांना आकाश कोटे मोटार साईकल चालवित असुन अक्षय वरखडे मागे बसला होता. वराडा गावच्या रस्त्यावर श्री मुंगले यांचे शेताजवळ सामोरून आलेल्या वाहनाच्या तिव्र प्रकाशाने रस्त्यावर अचानक जनावर आडवे आल्याने घाबरून आकाश चे दुचाकी वरील नियंत्रण सुटुन रस्त्यालगत असलेल्या विद्युत डिपी मध्ये दुचाकी घुसुन डिपी च्या लोखंडी खांबाला धडक लागुन भयंकर अपघात झाला. यात आकाश कोटे च्या डोक्याला जोरदार मार लागुन घटनास्थळीच मृत्यु झाला आणि अक्षय वरखडे ला सुध्दा डोक्याला मार लागुन गंभीर जख्मी होत बेहोश झाला होता.

सदर घटनेची माहीती गावकऱ्यांनी कन्हान पोलीसांना दिल्याने पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन दोघांनाही ग्रामीण उपजिल्हा रूग्णालय कामठी ला रवाना केले .अक्षय वरखडे गंभीर जख्मी असल्याने त्यास कामठी खाजगी रूग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहे.
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी अक्षय वरखडे च्या तोंडी बयाणा वरून पोस्टे ला गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पुढील तपास करित आहे.
वराडा गावच्या रस्त्या लगत नविन विद्युत डीपी लावण्यात आल्याने अक्षय कोटे या युवकाचा मुत्यु झाल्याने गावकऱ्यांनी विद्युत मंडळावर संताप व्यक्त करित ही डीपी रस्त्याच्या लांब करून मृतकांच्या परिवारास आर्थिक मदत करित झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.


0 टिप्पण्या