Advertisement

क्रांद्री संताजी मंगल कार्यालय येथे क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्य महा महिला रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न

क्रांद्री संताजी मंगल कार्यालय येथे क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्य महा महिला रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच , सदस्यांच्या सत्कार

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील राष्ट्रीय महामार्गा वरील संताजी सभागृह कांद्री येथे क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्य महा महिला रोजगार मेळावा व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच , सदस्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मी ताई बर्वे यांच्याद्वारे करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री मा.राजेंद्र मुळक यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी कार्यक्रमात मा.राजेंद्र मुळक , सौ.रश्मी बर्वे , कांद्री ग्रामपंचायत माजी सरपंच बलवंत पडोळे माजी उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे यांचा सह अनेक मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात महिला प्रशिक्षण केंद्राला मा.राजेंद्र मुळक यांचा सामाजिक उपक्रमातून सिलाई मशिन वापट करण्यात आले . त्यानंतर जुनी कामठी, निलज, बोरडा , टेकाडी , गोंडेगाव येथील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा शाॅल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

या प्रसंगी प्रबोधनकार खंजीर वादक मा.तुषार दादा सूर्यवंशी , मा.दुधारामजी सव्वालाखे , मा.दयारामजी भोयर , सौ.अर्चनाताई भोयर , सौ. मंगलाताई निंबोने , सौ.मिनाताई कावळे , कू.करुणाताई भोवते , संदीप भेलावी , देवीदास जामदार , सौ.आशाताई राउत , चंद्रशेखर बावनकुळे , राहुल टेकाम , गणेश सरोदे , बैशाखु जनबंधु , देवचंद कुंभलकर , धनराज कारेमोरे महेश झोडावणे , आशाताई कनोजे , दुर्गाताई सरोदे , प्रकाश चाफले , सह आदि नागरिक , महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या