Advertisement

कन्हान येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणुन मराठी पत्रकार दिवस निमित्य पत्रकारांचा सत्कार

कन्हान येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणुन मराठी पत्रकार दिवस निमित्य पत्रकारांचा सत्कार

कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे ६ जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २११ वी जयंती आणि मराठी पत्रकार दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार एन.एस मालवीय , प्रमुख पाहुणे कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रा चे वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक राठोड , डॉ तेजस्वीनी गोतमारे , कन्हान शहर विकास मंच चे मार्गदर्शन भरत सावळे आणि उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्तेआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली .

यावेळी वरिष्ठ पत्रकार एन.एस मालवीय , शशांक राठोड , मंच मार्गदर्शक भरत सावळे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवन चिरित्र्यावर प्रकाश टाकुन पत्रकार संबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले .

त्यानंतर मान्यवर आणि शहर विकास मंच पदाधिकार्यांच्या हस्ते वरिष्ठ पत्रकार एन एस मालवीय , अजय त्रिवेदी , कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष मा.मोतीराम रहाटे , कार्याध्यक्ष कमल सिंग यादव , उपाध्यक्ष रविंद्र दुपारे , सचिव सुनिल सरोदे , कोषाध्यक्ष ऋषभ बावनकर , पुढाकार 24 तास मुख्य संपादक भारत पगारे , वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक राठोड , डॉ तेजस्वीनी गोतमारे ,
रोहित मानवटकर , निलेश गाढवे , आकाश पंडितकर , गणेश खोब्रागडे सह आदिंना डायरी , पेन आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष सुरज वरखडे , कोषाध्यक्ष भुषण खंते , मार्गदर्शक प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , हरीओम प्रकाश नारायण , कृणाल राजपुत , प्रदीप गायकवाड , निलेश शेळके , योगराज आकरे , सह आदि मंच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या