Advertisement

हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे फातिमा शेख यांची जयंती थाटात साजरी

हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे फातिमा शेख यांची जयंती थाटात साजरी

कन्हान – हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे सोमवार ९ जानेवारी ला फातिमा शेख यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शाळेचे संचालक मा.नरेंद्र वाघमारे आणि लायन्स क्लब कन्हान चे अध्यक्ष मा.दिनानाथजी वर्मा यांच्या हस्ते फातिमा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी मा.नरेंद्र वाघमारे साहेब यांनी फातिमा शेख यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले , त्यानंंतर मुख्याध्यापक कु.वंदना रामापुरे यांनी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या बद्दल विद्यार्थांना मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाचे सुत्र संचालन आयशा अंसारी यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत चांदेवार यांनी केले.

या प्रसंगी भास्कर सातपूते , हेमंत वंजारी , जयश्री पवार , मंदाकिनी रंगारी , अभिषेक मोहनकर , हेमंत वाघमारे , गणेश रामापुरे , आणि समस्त शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या