Advertisement

वाघोडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी विलास गिऱ्हे विजयी

वाघोडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी विलास गिऱ्हे विजयी

विलास गिऱ्हे यांच्या नेतुत्वात ग्राम विकास परिवर्तन पॅनल वाघोडा चे सरपंच व उपसरपंच पदी निवड

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – ग्राम विकास परिवर्तन पॅनल व्दारे माजी उपसरपंच विलास गिऱ्हे यांच्या नेतुत्वात वाघोडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक लढविण्यात आली. यात गावातुन सरपंच पदी बहुमताने सौ शुभांगी प्रमोद बावने हयाना तर नवनिर्वाचित सदस्य विलास गिऱ्हे यांची उपसरपंच म्हणुन दणदणित विजयी झाले .

ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२२ मध्ये ग्रामविकास परिवर्तन पॅनल वाघोडा ची निवडणुक मा. विलास गिऱ्हे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली होती. यात सर्व गावातुन संरपच म्हणुन सौ शुभांगी प्रमोद बावने तर उपसरपंच पदी श्री विलास रूपराव गिऱ्हे यांचा दणदणित विजय झाला आणि सदस्या सौ सुर्यकांता सतिश बावने , सदस्य मा.हंसाराम तानबाजी बावने विजयी झाले . या यशा करिता विध्याधर गेडाम, गणेश बावने, शिवदास गेडाम, गोविंदा चौधरी, श्रीराम बावने, विनायक मेश्राम, हिरामन बावने, अरूण इंगळे, प्रभु बावने, अरूण बावने, रविन्द्र बावने, ईश्वर बावने, भोजराज बावने, गोविंदा गिऱ्हे, अमृत झिंगरे, बाळाभाऊ गेचुडे, सुदाम भाऊ मेश्राम, शंकर सोनबर्से, प्रल्हाद चौधरी, चक्रधर गेडाम, सचिन गिऱ्हे, बाबू गेडाम, अशोक गेडाम सह ग्रामस्थाचे मौलाचे सहकार्य लाभले. या विजया बद्दल सरपंचा, उरसरपंच व सदस्याचे स्वागत, अभिनंदन करून वाघोडा गावात जल्लोष साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या