बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी द्वारे हळदी – कुंकु कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
मकर संक्रांत निमित्य कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान – कन्हान मानव मंदिर पटेल नगर येथे मकर संक्रांत कार्यक्रम बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी द्वारे महिलांचा हळदी – कुंकु कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
मंगळवार दिनांक १७ जानेवारी ला मकर संक्रांत कार्यक्रम मानव मंदिर पटेल नगर येथे बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी च्या वतीने आयोजित करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.बेबीबाई वरणकर , प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद नागपुर माजी अध्यक्षा व सदस्या सौ.रश्मी बर्वे , कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर , नगरसेविका रेखा टोहणे , वर्षा लोंढे , बाबा हनुमानजी सेवक संस्थेची कार्याध्यक्ष सौ.चंद्रकला देशमुख सह आदि मान्यवरांचा हस्ते वाराणसी आई यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण , दीप प्रज्वलन आणि मान्यवरांचा सत्कार करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
कार्यक्रमात मुलींनी मनोरंजनासाठी एकल नृत्य बाबांचा गीतावर सादर केले आणि स्वागत गीत रजनी ताई परते , भावना धुर्वे यांनी सादर केले . यावेळी मान्यवरांनी उपस्थित महिलांना आपल्या भाषणातुन विविध माहिती देऊन मार्गदर्शन केले . त्यानंतर मान्यवरांचा हस्ते महिलांना हळदी – कुंकु लावुन वान वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाच्या शेवटी सहभोजन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार सौ.स्वातीताई देशमुख यांनी केले
या प्रसंगी कविता हावरे , गीताताई सहारे , ज्योती बंड , आशा पाल , सरस्वती बाई जुंभळे , रमा सहारे , मनिषा घुले , सरीता भोयर , गीता गोंडाणे , मनिषा राऊत , लक्ष्मीताई देशमुख , छाया केवट , वनीता वंजारी , सुनिता देवांघन , सुनिता निशाद , रुपाली रहाटे , दया वानखेडे , शीतल फुले , सीमा भोयर सह आदि सेवकीन महिला आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान


0 टिप्पण्या