Advertisement

एम.एच.के.एस पेट्रोल पंप समोर बोलोरो च्या धडकेत अनोळखी महिलेचा मुत्यु

एम.एच.के.एस पेट्रोल पंप समोर बोलोरो च्या धडकेत अनोळखी महिलेचा मुत्यु

कन्हान पोस्टे ला बोलोरो वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान  – कन्हान शहरातील  नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील वराडा गावा जवळील एम.एच.के.एस पेट्रोल पंप समोर कन्हान कडुन आलेल्या बोलोरो चारचाकी वाहन चालकाने अनोळखी महिलेला जोरदार धडक मारल्याने गंभीर जख्मी अनोळखी महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.१७) जानेवारी ला सायंकाळी ६१५ वाजता च्या दरम्यान नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र ४४ वरील वराडा गावा जवळील एमएचकेएस पेट्रोल पंप समोर  कन्हान कडुन आलेल्या बोलोरो चारचाकी वाहन चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन रस्त्या च्या बाजुला उभ्या असलेल्या महिलेला जोरदार धडक मारल्याने ती खाली पडल्याने बेहोश होऊन गंभीर जख्मी करून बोलोरो वाहन चालक वाहना सह मनसर कडे पळुन गेला. तेथे जवळ पंपवर असलेले वराडा चे पोलीस पाटील संजय नेवारे हयानी जाऊन पाहणी केली असता महिला गंभीर जख्मी दिसल्याने संजय यांनी घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन गंभीर जख्मी अनोळखी महिलेस उपचारार्थ शासकीय मेयो रूग्णालय नागपुर नेले असता तिचा उपचारा दरम्यान रात्री मृत्यु झाला.

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी पोलीस पाटील संजय नेवारे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला बोलोरो चारचाकी वाहन चालका विरूध्द कलम २७९ , ३०४ ए भांदवि सहकलम १८४ , १३४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपी चा शोध घेत आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या