Advertisement

सावित्रीबाई फुले आशिया खंडातील पहिल्या स्त्री-शिक्षिका-प्रा जयराम माळी

सावित्रीबाई फुले आशिया खंडातील पहिल्या स्त्री- शिक्षिका-प्रा जयराम माळी

सुरगाणा महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर होते. याप्रसंगी प्रा. जयराम माळी यांचे व्याख्यान झाले .ते व्याख्यानाप्रसंगी म्हणाले की ,सावित्रीबाईंचे कार्य हे संपूर्ण जगाला आदर्शवत आहे. जिथे सर्वसामान्य लोकांच्या शिक्षणाचा प्रश्न होता अशा परिस्थितीत सावित्रीबाई स्वतः शिकून शिक्षणाची मशाल बनून त्यांनी सर्व स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी वसा घेतला. त्या भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सी.जी. दिघावकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मुलींनी सावित्रीबाईंचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल केली पाहिजे. फक्त जयंती पुरता त्यांचा विचार मर्यादित न ठेवता तो कायम अमलात आणला पाहिजे . प्रास्ताविक प्रा. एस. आर. पावडे यांनी केले .या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिनिधी – किशोर जाधव, सुरगाणानाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या