Advertisement

भाजपा महिला आघाड़ी द्वारे सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी

भाजपा महिला आघाड़ी द्वारे सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी द्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड चौक येथे करण्यात आले .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा नागपुर जिल्हा महिला आघाड़ी उपाध्यक्ष सौ.स्वाती पाठक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .यावेळी महिला आघाड़ी शहर अध्यक्ष सौ.तुलेषा नानवटकर , सदस्य सुनंदा दिवटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .

या प्रसंगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , नगरसेविका सुषमा चोपकर , वर्षा लोंढे , वंदना कुरडकर , लक्ष्मी लाडेकर , प्रतीक्षा चवरे , मीना कळंबे , कामेश्वर शर्मा , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , दिपचंद शेंडे , संजय रंगारी , मयुर माटे , ऋषभ बावनकर , दिपणकर गजभिए , सुरेश कळंबे सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या