Advertisement

बाहुबली अँग्रो इंडस्ट्रीज मधिल ८३,३५८ रूपये मुद्देमाल साहित्याची चोरी

बाहुबली अँग्रो इंडस्ट्रीज मधिल ८३,३५८ रूपये मुद्देमाल साहित्याची चोरी

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारातील बाहुबली अँग्रो इंडस्ट्रीज मधिल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लोखंडी साहित्य चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी दशरथ काळे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.२८) डिसेंबर ला रात्री ८ वाजता दरम्यान दशरथ पुडलिक काळे वय ५२ वर्ष रा. वराडा हे बाहुबली अँग्रो इंडस्ट्रीज कंपनीत आपल्या मुलाच्या चौकीदारी ड्युटीवर गेले व कंपनी तील परिसराची पाहणी करुन कंपनीच्या गेटवर थांब ले असता दुसऱ्या दिवशी गुरुवार (दि.२९) डिसेंबर ला सकाळी ७ वाजता दरम्यान कंपनीतुन घरी निघुन गेले. दशरथ हे आपल्या घरी हजर असतांना त्यांना कंपनी मध्ये काम करणारे लेबर नितेश याने फोन करुन सांगि तले की,आपल्या कंपनी मध्ये चोरी झाली आहे.

अशा माहिती वरुन दशरथ कंपनी मध्ये जावुन पाहणी केली असता कंपनी मध्ये नविन बांधकाम सुरु असुन शेड चे काम करण्यासाठी आणलेले व कंपनीच्या मागच्या बाजुला भींतीला लावुन ठेवलेले साहित्य १) लोखंडी फ्लेज ब्रास १५० नग वजन ३५० किलो, २) लोखंस रूप क्लिट ४३ नग वजन ८५ किलो, ३) लोखंडी साई डबॉल क्लिट ८ नग वजन २६ किलो, ४) लोखंडी एम १२, ४० एम.एस बोल्ट-नट + वाॅशर २ बँग वजन ७५ किलो, ५) लोखंडी एम २०, ६० एच एस बोल्ट- नट + वाॅशर २ बॅग वजन ७० किलो, ६) लोखंडी एम २०, ७० एचएस बोल्ट, नट+वाॅशर २ बॅग वजन ७० किलो असा एकुण ६७६ किलो किंमत ८३,३५८ रुपये चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी दशरथ काळे यांचे तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टे शनचे पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्श नात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या