Advertisement

विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा

विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा

सुरगाणा :- सुरगाणा  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे 25 जानेवारी 2023 रोजी राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते प्रा. एस. के. पवार म्हणाले की, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि जागरूक राहण्यासाठी या दिवशी मतदारांना मतदानाची शपथ दिली जाते. सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.

तरुणांनी मतदानाबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. भारतात दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. प्रत्येक नागरिकाचे मत नवा भारत घडू शकते. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करणे हे गरजेचे आहे. भारताची प्रगती आणि विकास हे मतदारांच्या मताने ठरविले जाते. देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे हे या दिनाच्या निमित्ताने सांगितले जाते. नागरिकांनी आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर केला तर योग्य प्रतिनिधी निवडून जाऊ शकतात. यावेळी मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस. एम. भोये यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.एस.आर. पावडे यांनी केले. आभार प्रा. गोरी इल्यास यांनी मांडले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. अहिरे, कार्यालयीन अधीक्षक श्री. आर. टी. चौधरी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिनिधी – किशोर जाधव, सुरगाणा-नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या