अम्मा दर्गा गाडेघाट येथे २७ जानेवारी ला बाबा ताजुद्दीन जन्मोत्सवा चे आयोजन
कन्हान – हुजूर मरियम अम्मा दर्गा गाडेघाट (जुनीकामठी) येथे २७ जानेवारी ला संत बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात येणार आहे .
शुक्रवार (दि.२७) जानेवारी २०२३ ला संत बाबा ताजुद्दीन यांच्या १६२ वा जन्मोत्सव निमित्त हुजूर मरियम अम्मा दर्गा गाडेघाट (जुनीकामठी) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करुन दुपारी ३०० वाजता १५० किलो चा केक कापण्यात येईल . हजरत बाबा ताजुद्दीन औलिया (र.अ.) यांचे जन्मस्थान कामठी असुन बाबा हे कामठी , गाडेघाट , जुनीकामठी , वाकी परिसरात फिरत असल्याने त्यांच्या पद स्पर्शाने समस्त परिसर पावन झाला आहे . तसेच हुजूर मरियम अम्मा यांना बाबा ताजुद्दीन यांनी भक्तात सर्वोच्च स्थान दिले होते . हुजूर मरियम यांना ‘अम्मा’ असे स्वतःताजुद्दीन बाबांनी संबोधले आहे . त्यामुळे कन्हान नदी काठीवर असलेल्या हुजूर मरियम अम्मा दर्ग्या ला विशेष महत्व प्राप्त आहे . गाडेघाट (जुनीकामठी) येथे हजरत ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . या वर्षी सुद्धा जन्मोत्सव निमित्त विविध भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
करिता परिसरातील भाविक मंडळीने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन हुजूर मरियम अम्मा दर्ग्याचे सज्जादानशीन ताजी तनवीरुद्दीन , ताजी मुस्तफीजुद्दीन हयांनी केले आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या