Advertisement

कुही फाटा बिरसा मुंडा नगर येथे सावित्रीबाई फुले यांची साजरी

कुही फाटा बिरसा मुंडा नगर येथे सावित्रीबाई फुले यांची थाटात साजरी

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कुही – मानव विकास सेवा बहुउद्देशीय संस्था नागपूर व ईकोनेट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची १९२ वी जयंती कुही फाटा बिरसा मुंडा नगर येथे थाटात साजरी करण्यात आली .

कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य विभाग सीडीपीओ सौ. मंगला ताई क्षिरसागर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली आणि
नागरीकांना , विद्यार्थांना शिक्षणाचा महत्त्व अधिकार व आरोग्य विषयक मूलभूत अधिकार समजवून सांगुन सावित्रीबाई फुले यांचा जीवन चिरित्र्यावर मार्गदर्शन केले .

या प्रसंगी आशा सेविका सौ. सारिका जारोंडे , आंगनवाडी सेविक सौ.दुर्गावती पटले , शिक्षिका जिल्हा परिषद शाळा सौ.दिपाताई माटे , कुही ग्रापंचायत सदस्य व ईकोनेट पुणे चे समन्वयक मा. अमर कटौते , पॅरालिगल कार्यकर्ते मा.विनोद पवार , सौ ललिता ताई कुळमते , रविभाऊ कुरडकर , सौ सरोज ताई बोरकर ,सौ सुलकाताई वरठे , कार्तिक टेकाम , राजेश कटौते , राकेश उईके , सह आदि गावकरी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या