Advertisement

टेकाडी ग्रा प सदस्य सतिश घारड यांनी रक्तदान करून स्विकारला पदभार

टेकाडी ग्रा प सदस्य सतिश घारड यांनी रक्तदान करून स्विकारला पदभार

सहकाऱ्यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन .

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) अंतर्गत प्रभाग क्र.२ मधुन युवा शक्ती ग्राम विकास पॅनल चे सतीश घारड यांनी ९७२ मतां पैकी ४१८ मत घेऊन दणदणित विजय मिळवला. अपक्ष पद्धतीने लढलेल्या या उमेदवाराच्या सहकार्यांनी पदभार स्विकारण्या आधी रक्तदान करण्याचा संकल्प करून तोही यशस्वि करून दाखविल्याने गावात सध्या या अनोख्या संकल्प नेची चांगलीच चर्चा आहे.

गुरूवार (दि.५) जानेवारी ला महाजन नगर मित्र परिवार टेकाडी द्वारा समाज भवन परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करून शुक्रवार ला ग्राम पंचायत सदस्य म्हणुन पदभार स्विकारण्या आधी काही तरी आगळ वेगळा उपक्रम करण्याची संकल्पना व्यक्त करित समर्थकांनी रक्तदान करून पदभार स्विकारण्याची संकल्पना गुरुवार ला रक्तदान शिबीरात नवनिवार्चित टेकाडी (को ख) ग्रा.प सदस्य सतीश घारड यांनी रक्तदान करून शुक्रवार ला सदस्य पदाचा कार्यभार सांभाळला. गावकरी मतदात्यानी केलेल्या अमुल्य मतदान आणि सहकाऱ्यांचा रक्तदानाचा विश्वास निर्थक जावु देणार नाही. सर्वसामान्य माणसांची योग्य ती कामे करून ग्राम पंचायत अंतर्गत कराव्या लागणाऱ्या विकासात्मक कामांच्या प्रयत्नाला तडा जाऊ देणार नाही अशे मत शिबिरा दरम्यान सतिश घारड यांनी व्यक्त केले. शिबिराला प्रामुख्याने विशेष फुटाणे , रमेश दळणे, डॉ. अनिल नानवटकर, मारोती हुड, आकाश कडु, गिरधर चिकाने, नितेश वानखेडे, सारंग हुड, राजकुमार वझेकर, दुष्यंत राऊत, सुरेश हुड, विशाल सरनागते, सौरव बोरकर, बंटी दळणे, लोकेश हुड, अभिजित लंगडे, अविनाश उमप, बंटी भुते, अमित भोयर, श्रीकांत हुड, नरेश घारड सह ग्रामस्थाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या