Advertisement

आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि पत्रकार दिवस थाटात साजरा

आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि पत्रकार दिवस थाटात साजरा

विदर्भ भुमिपुत्र बहुउद्देशीय संस्था द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – विदर्भ भुमिपुत्र बहुउद्देशीय संस्था कन्हान शहर अध्यक्ष मा.शिवशंकर (चिंटु) वाकुडकर यांच्या द्वारे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन आपले सरकार सेवा केंद्र पांधन रोड कार्यालय येथे करण्यात आले .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जेष्ठ पत्रकार एन एस मालवीय सर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात केली . यावेळी जेष्ठ पत्रकार एन एस मालवीय सर , कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. मोतीराम राहाटे , मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.सुर्यभान फरकाडे सह आदि ने बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकार एन एस मालवीय सर , मोतीराम राहाटे , सुर्यभान फरकाडे , रमेश घोळघाटे , कमल सिंग यादव , धनंजय कापसीकर , चंद्रकुमार चौकसे , अनिल जाधव , विमल त्रिपाठी , रवि दुपारे , भरत पगारे , ऋषभ बावनकर , आकाश पंडितकर , रोहित मानवटकर , प्रकाश तिवारी , विवेक पाटील , दिनेश नाटवटकर , जयंत कुंभलकर यांचा डायरी , पेन , मिठाई बाॅक्स आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाचे सुत्र संचालन अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजनिश मेश्राम यांनी केले .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विदर्भ भुमिपुत्र बहुउद्देशीय संस्था कन्हान शहर अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर , दिवाकर इंगोले , अनिल ठाकरे , रंजनिश मेश्राम , हरीश तिडके , छोटू राणे , अजय चव्हाण , मृणाल सरोजकर , गिरीश सेलोकर , सह आदि ने उपस्थित राहुन सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या