Advertisement

गणेश मंदिरातून१०८ मंगल कलश व पोथी शोभायात्रा काढुन तिळ संकट चतुर्थी महोत्सवाचा शुभारंभ

गणेश मंदिरातून१०८ मंगल कलश व पोथी शोभायात्रा काढुन तिळ संकट चतुर्थी महोत्सवाचा शुभारंभ

शोभायात्रे चे विविध ठिकाणी जंगी स्वागत

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरातील पांधन रोड वरील प्रसिद्ध सिद्धिविनायक श्री गणेश मंदिरातुन रविवार ला १०८ महिलांनी मंगल कलश घेऊन व पोथी शोभायात्रा काढुन तिळ संकट चतुर्थी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला .

या शोभायात्रेत १०८ महिला डोक्यावर कलश घेऊन यात्रेत सहभागी झाले होते . या यात्रे मध्ये अनेक वेगवेगळे नृत्य पाहायला मिळाले .यात्रा आंबेडकर चौक , गांधी चौक , तारसा चौक , गहुहिवरा चौक सह आदि परिसरातील मार्गाने भ्रमण केले . या वेळी यात्रेचे विविध ठिकाणी फुलाच्या वर्षाने , शरबत , नमकीन पॅकीट , अल्पोहार वितरित करुन भव्य स्वागत करण्यात आले व श्री गणेश मंदिर वृंदावनधाम येथे यात्रेचे समापन करण्यात आले .
त्यानंतर संगीतमय श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन भागवताचार्य ऋचा गोस्वामी यांच्या सुमधुर भाषणात रविवार दिनांक 1 जानेवारी ला दुपारी 3 वाजता पासून सुरवात करण्यात आली . हे पर्व १२ जानेवारी पर्यंत सुरु राहणात आहे . या पर्वाचा आणि कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन आनंद घ्यावा असे आव्हाहन मंदिर कमेटी चे आयोजन समिति द्वारे करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या