अम्मा साहेबा दर्गा गाडेघाट येथे पत्रकारांचा सत्कार व सहभोजन
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – हुजूर मरियम अम्मा साहेबा दर्गा गाडेघाट येथील ताजी तनविरूद्दीन सज्जादा नशीन यांच्या व्दारे पत्रकार दिनाचे औचित्य साधुन कन्हान येथील पत्रकारांचा सत्कार करून सहभोजन करण्यात आले.

गाडेघाट येथील प्रसिध्द हुजूर मरियम अम्मा साहेबा दर्गा येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधुन कन्हान च्या पत्रकारांना आंमत्रित करून उपस्थित पत्रकारा व्दारे हुजूर मरियम अम्मा साहेबास गुलाब पुष्प अर्पण व पुजन करण्यात आले. त्यानंतर ताजी तनविरूद्दीन सज्जादा नशीन व ताजी मुस्तफीजुद्दीन सज्जादा नशीन यांच्या हस्ते जेष्ट पत्रकार एन एस मालविये , ग्रामिण पत्रकार संघ अध्यक्ष मोतीराम रहाटे , मराठी पत्रकार संघ अध्यक्ष सुर्यभान फरकाडे , कमलसिंग यादव , रमेश गोळघाटे , शांताराम जळते , धनजय कापसिकर , विमल त्रिपाठी , विवेक पाटील , रविंद्र दुपारे , ऋृषभ बावनकर , रोहीत मानवटकर , आकाश पंडीतकर , आदी चे गुलाब पुष्पहार, चादर फेटा बाधुन सत्कार करित सन्मानित करण्यात आले.
सहभोजनासह चायपाणी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली


0 टिप्पण्या