मलबार ग्रुपतर्फे सुरगाणा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दोन लाखाची स्कॉलरशिप वितरण
सुरगाणा- नाशिक: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे मलबार ग्रुपतर्फे महाविद्यालयातील 25 विद्यार्थिनींना प्रत्येकी 8000 रुपयांची स्कॉलरशिपचे वितरण करण्यात आले. मलबार ग्रुपचे श्री. गौतम नायर हे त्यानिमित्ताने महाविद्यालयात आले होते. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात श्री. गौतम नायर म्हणाले की, मलबार ग्रुप आपल्या एकूण नफ्याचा 5% वाटा हा सीएसआर फंडातर्फे शिक्षण, आरोग्य, गरिबांच्या गृहनिर्माण आणि महिला सबलीकरण यासाठी खर्च करते. मलबार चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य संपूर्ण भारतात आहे. या ट्रस्टने आत्तापर्यंत 20000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केलेली आहे.
15000 पेक्षा जास्त गरीब कुटुंबांना घरे उपलब्ध करून दिलेली आहे. शिवाय 2000 पेक्षा जास्त गरिबांचे लग्न लावून दिलेले आहे. कित्येक लाख लोकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिलेली आहे. भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना जर कोणतीही मदत लागली तरी ती उपलब्ध करून दिली जाईल अशी ही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर स्कॉलरशिप वितरण सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कार्यक्रमप्रसंगी मलबार ग्रुपचे दिपक कोकाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.सागर पालवे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा व्ही.डी. अहिरे, शैक्षणिक सुपरवायझर प्रा. एस. एम. भोये कार्यालयीन अधीक्षक श्री. आर. टी. चौधरी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी – किशोर जाधव, सुरगाणा- नाशिक
0 टिप्पण्या