कांद्री ला रक्तदान शिबिर कार्यक्रमाने शौर्य दिवस साजरा
शिबीरात एकुण २७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भीमा कोरेगाव शौर्य समिती, आकाशझेप फाउंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या ऐतिहासिक पर्वावर १ जानेवारी ला कांद्री (कन्हान) बस स्टॉप येथे महा रक्तदान शिबीर कार्यक्रमाने शौर्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे , रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे , डॉ.मुकेश वाघमारे , रजनीश मेश्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भीमा कोरेगाव येथे १८१८ला पेशवाईच्या विरुध्द झालेल्या लढ्यात शौर्याने लढा देणाऱ्या पराक्रमी वीरांना मानवंदना दिली.
या प्रसंगी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रक्तपेढी नागपूरचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.मुकेश वाघमारे , समाजसेवा संदीप महाकाळकर व रक्तसंक्रमण चमूने उत्तमरीत्या रक्त संकलन केले . या रक्तदान शिबीर कार्यक्रमात परिसरातील युवा राहुल बागडे, राहुल टेकाम, काजल गजभिये, दीपक टेकाम, देवचंद्र कुंभलकर, राहुल देवतळे, प्रमोद सुखदेवे, चेतन कुमार चव्हाण, चेतन करड भाजणे, निकेश मेश्राम, सुमित वाहने, सागर वानखेडे, उमेश कुमार राहांगडाले, नरेंद्र ठाकरे, बबलू भगत, जितेंद्र विश्वकर्मा, रविंद्रकुमार डेहरीया, सुरेश सूर्यवंशी, भूनेश्र्वर वंजारी, गणेश मस्के, शरयू चंदनखेडे, राहूल मेश्राम, सुनील उपरीकर, सुम्रन मेश्राम, माणिक भोवते प्रकाश आल्लेवार यांचेसह २७ नागरिकांनी रक्तदान करुन मानवता व राष्ट्रीयतेचा कृतिशील संदेश दिला .
या महारक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्विते करिता निकेश मेश्राम, गोलू वेलेकर, राहूल बागडे, धर्मराज मनगटे, इंद्रपाल सुखदेवे, रजत सहारे, प्रशिक सुखदेवे, राहूल मेश्राम, सोनू मेश्राम, सागर वानखेडे, नितेश पाली, रविंद्र डेहरिया, शुभम मेश्राम, आकाश रहीले यांचा सह आदि ने सहकार्य केले .
0 टिप्पण्या