Advertisement

कन्हान नदी नविन पुलावर पडले गड्डे , सळाखी उघडया पडल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वाढली

कन्हान नदी नविन पुलावर पडले गड्डे , सळाखी उघडया पडल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वाढली

कन्हान शहर विकास मंच च्या मागणी ला जनप्रतिनिधी आणि अधिकार्यांनी दाखविली केळाची टोपली

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान नदी वरील नविन पुलाचे लोकार्पण होऊन फक्त चार महीने झाले . लोकार्पण झाल्या पासुनच नविन पुलावर दिवसेन दिवस मोठ मोठे गड्डे पडुन सळाखी दिसु लागले आहे . या विषयी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालय , उपविभागीय अधिकारी कार्यालया मार्फत केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी हयांना निवेदन पाठवुन तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद आमदार मा.चंद्रशेखर बावनकुळे , रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन चर्चा करुन निवेदन देऊन नवनिर्मित पुलाच्या बांधकामाची चौकशी करुन दोषी अधिकार्यां वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु जन प्रतिनिधी आणि अधिकार्यांनी केळाची टोपली दाखविल्याने पुलावर मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे .

वर्ष २०१४ मध्ये कन्हान नदी वरील नवीन पुल ५०.६० कोटी रुपये बांधकामाचे भुमिपुजन तकालिन रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस व रामटेक खासदार मुकुल वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले होते . त्यानंतर देशात सत्ता परिवर्तन झाल्याने केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांनी पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिल्याने कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाच्या बांधकामाची सुरू करण्यात आले . कंत्राटदार , अधिकारी व कामगारांच्या दिरंगाई , काहीना काही अडचणी येत भरपुर वेळा पुलाचे बांधकाम थांबले होते . कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाचे बांधकाम पुर्ण करण्यास जवळपास ८ वर्षे लागली . पुलाचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर वाहन चालक आणि स्थानिक नागरिक पुलावरून वाहतुक सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत असतांना १ सप्टेंबर २०२२ ला केंद्रीय मंत्री मा.नितिनजी गडकरी यांच्या हस्ते विद्यमान विधान परिषद आमदार मा.चंद्रशेखरजी बावनकुळे , रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपालजी तुमाने , रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल , कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर , माजी आमदार मा.मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्मित पुलाचे लोकार्पण करण्यात आले . नवनिर्मित पुलावरुन जड वाहतुक, ट्रॅव्हल्स, बसेस, चारचाकी, दुचाकी सह अनेक प्रकार चे दररोज हजारो जड वाहने धावु लागले. परंतु पुला च्या बांधकाम करतांना नेशनल हाईवे चे अधिकारी , कंत्राटदार , कामगारांचे दुर्लक्ष , निष्काळजीपणाने दिरंगाई करित बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने लोकार्पण झाल्या पासुनच नवनिर्मित पुलावर मोठ-मोठे गड्डे पडुन सळाखी उघडया दिसु लागल्या. काही भागात पुलाचा रस्ता तडकलेला असुन रोड पुर्णपणे खराब झाल्याने वाहन चालका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . या पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न करताना जणु राजकिय पैज लागली होती. तशी तत्परता येथील जनप्रतिनिधी व काही राजकीय मंडळीने दाखविली असती तर पुल बांधकामास ८ वर्षे लागली नसती तसेच बांधकाम सुध्दा चांगल्या प्रकारे झाले असते.

कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी पुलाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

कन्हान नदी वरील नविन पुलाच्या लोकार्पण होऊन फक्त २५ दिवसात पुलावर गड्डे पडुन सळाखी दिसु लागल्याने शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद आमदार मा.चंद्रशेखर बावनकुळें यांची भेट घेतली असता त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी नरेश बोरकर हयांना फोन करुन योग्य कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर शहर विकास मंच पदाधिकार्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांना भेटुन नवनिर्मित पुलाच्या समस्या बाबत निवेदन दिले. तसेच तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांना निवेदन पाठवुन नवनिर्मित पुलाच्या बांधकामाची चौकशी करुन दोषी अधिकार्यां वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु आमदार आशिष जयस्वाल आणि अधिकार्यांनी योग्य दखल न घेतल्याने पुला वर दिवसेन दिवस मोठे मोठे गड्डे पडुन सळाखी दिसु लागल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने पुलाची व्यवस्थित दुरुस्ती करुन पुल व रस्ताचे बांधकाम मजबुत आणि टिकाऊ करण्यास जनप्रतिनिधी व राजकीय मंडळी आता पैज का लावित नाही ? अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या