Advertisement

सिहोरा शिवार येथुन विद्युत खांब व विद्युत तारा सह एकुण ६२ हजार रुपये च्या मुद्देमाल चोरी

सिहोरा शिवार येथुन विद्युत खांब व विद्युत तारा सह एकुण ६२ हजार रुपये च्या मुद्देमाल चोरी

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ३ कि.मी अंतरावर असलेल्या सिहोरा येथील महालक्ष्मी कंपनी ते सिहोरा गाव शिवारातील विद्युत लाईनचे लोंखडी विद्युत खांब व त्या वरील अल्युमिनीयम तार कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगलवार (दि.२८) डिसेंबर २०२२ चे सायंकाळी ५ वाजता ते (दि.३०) डिसेबर चे सकाळी ११ वाजता दरम्यान कन्हान विद्युत विभाग कार्यालयाचे सहायक अभियंता प्रल्हाद ओमकार यांना सिहोरा गावच्या एका शेतकऱ्याने फोन करून सांगीतले की , महालक्ष्मी कंपनी ते सिहोरा गावच्या ११ केवी च्या विद्युत लाईन चे विधृत खांब व त्या वरील अल्युमिनीयमचा तार कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे . यामुळे कन्हान विधृत केंद्राच्या कर्मचाऱ्याना सोबत घेऊन सिहोरा येथे घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता एक विद्युत खांब व विद्युत अल्युनिनियम ५४० मिटर तार दिसला नाही.

महालक्ष्मी कंपनी ते सिहोरा गाव पर्यंत शिवारात लावलेले विद्युत खांबा पैकी एक लोखडी विद्युत खांब व त्या वरील ५५ एम एम विद्युत अल्युमिनीयमचा ५४० मिटर तार किंमत अंदाजे ६२००० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी कन्हान विद्युत कार्यालय हनुमान नगर चे शहर विद्युत विभाग सहायक अभियंता प्रल्हाद ओमकार यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुध्द अप क्र ७६१/ २२ नुसार कलम ३७९ भादंवि व भारतिय विद्युत अधिनियम २००३ अनुसार कलम १३० कायद्यान्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या