Advertisement

सत्रापुर येथे युवकाने गळफास लावुन केली आत्महत्या

सत्रापुर येथे युवकाने गळफास लावुन केली आत्महत्या

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल

कन्हान – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथे युवकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी चंद्रभान बर्वे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दि.१८ डिसेंबर रोजी रात्री १२३० ते १०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी चंद्रभान दामाजी बर्वे वय ५२ वर्ष रा. सत्रापुर कन्हान यांची पत्नी सौ. सुरेखा चंद्रभान बर्वे वय ४८ वर्ष रा. सत्रापुर कन्हान हि पाणी पिण्याकरिता उठली असता चंद्रभान यांचा मुलगा मृतक अभिषेक उर्फ गुलु चंद्रभान बर्वे वय २६ वर्ष रा सत्रापुर यानी मधल्या रुम मधील वरील फाट्याला नेवारीच्या बांधलेल्या पाळण्याचा दोरी ला फाशी लावलेल्या अवस्थेत दिसल्याने चंद्रभान यांची पत्नी किंचाळुन उठली . तेव्हा चंद्रभान यांची मुलगी व चंद्रभान झोपे तुन उठुन सुरेखा का ओरडली हे बघण्याकरीता मधल्या रुम मध्ये गेले असता चंद्रभान यांचा मुलगा हा फाशी लावलेल्या अवस्थेत पाडण्याला अडकुन दिसला . तसेच चंद्रभान यांची पत्नी आणि मुली ने मिळुन त्यास खाली उतरविले व त्याला हालवुन बघीतले असता त्यांने कोणत्याही प्रकारे हालचाल केली नाही . तेव्हा चंद्रभान यांचा लहान जावई रा.नागपुर यांना फोन करुन सांगीतले की गुलुने फासी लावली आहे .

तेव्हा त्यांनी १०० नंबर वर कॉल करुन सांगीतले व तसेच १०८ नंबर वर कॉल करुन सुद्धा सांगीतले तेव्हा आमच्या घरी एम्ब्युलेंस आली व मृतक अभिषेक याला एम्ब्युलेंस ने चौधरी हॉस्पीटल कामठी येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले व त्यास सरकारी दवाखाना कामठी येथे घेऊन जाण्यास सांगीतले असता चंद्रभान यांनी त्यास सरकारी दवाखाना कामठी येथे घेऊन गेले . तेथून चंद्रभान हे पोलीस स्टेशन कन्हान येथे सदर घटनेची तक्रार देण्या करिता आले असता त्यांनी तक्रारी मध्ये सांगितले कि माझ्या मुलाने कोणत्या कारणाने फांसी लावली हे मला माहीती नाही व माझा कोणावर संशय सुद्धा नाही . अश्या फिर्यादी चंद्रभान बर्वे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी पोस्टे ला कलम १७४ जाफौ मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे एएसआई सुर्यभान जळते , मंगेश ढबाले हे करीत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या