Advertisement

सरपंच विद्या चिखले यांचा सह अनेक शेतकऱ्यांना पकडुन नवीन नगर परिषद मध्ये १७ घंटे कोंबुन ठेवले

सरपंच विद्या चिखले यांचा सह अनेक शेतकऱ्यांना पकडुन नवीन नगर परिषद मध्ये १७ घंटे कोंबुन ठेवले

राजकीय दबावा नंतर पोलीसांनी केली सुटका

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील गुप्ता कोल वॉशरीमुळे वराडा , एसंबा , वाघोली घाटरोहणा सह अनेक गावातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाले आहे . त्यामुळे गुप्ता कोल वाॅशरी बंद करण्याचा मागणी करिता शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला आणि संबंधित विभागाच्या अधिकार्यांना निवेदन दिल्या वर ही प्रशासना ने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी रविवार ला दुपारी कन्हान पोलीस स्टेशन चा घेराव करुन ठिय्या आंदोलन सुरु केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मागील तीन वर्षापासुन सतत गुप्ता कोल वाॅशरी बंद करण्याची मागणी वराडा गावातील शेतकरी आणि गावातील नागरिक करित आहे .परंतु महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ स्थानिक जन प्रतिनिधि च्या दबावा खाली काम करीत असल्याने ही कंपनी सुरु आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असल्याने शुक्रवार ला जय जवान जय किसान संघटन चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पवार यांचा नेतृत्वात शेतकऱ्यांनी गुप्ता कोल वाॅशरी समोर ठिय्या आंदोलन केले . काही वेळा नंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडाळाचे अधिकारी प्रवीण दराडे यांचाशी संवाद साधुन पोलीसांच्या बंदोबस्तात कंपनी बंद करण्यात आली होती .

शनिवार ला रात्री गुप्ता कोल वाॅशरी मधुन अवैध रित्या बेकायदेशीर कोळश्याचे ट्रक भरुन निघत असल्याने वराडा गावातील शेतकऱ्यांनी व गावातील नागरिकांनी गुप्ता कोल वॉशरी समोर आंदोलन सुरू केल्याने रात्री १ वाजता च्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी बेकायदेशीर १४ आंदोलनकर्तांना व गावकऱ्यांना ताब्यात घेतले आणि रविवार ला सकाळी चार महिलांना पोलीसांनी कन्हान पोलीस स्टेशन मध्ये आणले . आंदोलकांना जेरबंद करायला जागा नसल्याने पोलीसांनी बेकायदेशीर कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नवीन इमारत मध्ये बाहेरुन कुलूप बंद करुन कोंबुन ठेवले .

सदर विषयीची माहिती जय जवान जय किसान संघटने चे अध्यक्ष प्रशांत पवार , माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे , माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी , चंद्रपाल चौकसे , नरेश बर्वे , श्यामकुमार बर्वे , राजेश ठाकरे , प्रेम रोडेकर , महेंद्र भुरे यांना मिळताच त्यांनी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन सकाळ पासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली असता शेतकरी आंदोलकांवर कोणते गुन्हे दाखल केले . या विषयी विचारणा केली असता पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी वरिष्ठांचे आदेश आहे असे सांगितले . शेवटी परिसरात तनावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि पोलिसांवर दबाव वाढत असल्याने दुपारी चार ते पाच वाजता च्या सुमारास नगर परिषद चे कुलूप उघडून या आंदोलनकर्तांना मोकळे करण्यात आले असुन संतापलेल्या नागरिकांनी जय जवान जय किसान , पोलीस प्रशासन मुर्दाबाद , तानाशाही नही चलेगी कोल वॉशरी बंद झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी केली . दरम्यान १७ घंटे नंतर आंदोलनकर्त्यांना कलम ६८ नुसार ताब्यात घेत कलम ६९ नुसार सूचनापत्र देऊन सोडण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या