Advertisement

शाहिरांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल - सुधीर मुनगंटीवार

शाहिरांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल – सुधीर मुनगंटीवार

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

नागपूर : – राज्यातील शाहिरांच्या समस्यांची शासना ला जाणीव असुन त्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल. अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्य विधि मंडळाच्या अधिवेशनात मोर्चा घेऊन आलेल्या भारती य कलाकार शाहीर मंडळ आणि महाराष्ट्र शाहिर परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते .

यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या संस्कृतीत शाहिरांचे मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राचा इतिहास गावागावात लोकांच्या मनात जीवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केले आहे. अशा शाहिरांकडे शासन दुर्लक्ष करणार नाही. मात्र अनुदाना च्या मदतीवर शाहिरांनी अवलंबुन राहु नये , तर त्यांना काम देता यावे. असा शासनाचा प्रयत्न आहे. शासना च्या विविध विभागांच्या योजनांच्या प्रसिद्धि प्रसाराच्या कामी शाहिरांची कला कशी वापरता येईल याची शहा निशा करीत आहोत असे त्यांनी शाहिरांच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितले .

कोरोना काळात कलाकारांना मदत देण्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली. मात्र त्यासाठी माहिती गोळा करण्याचे काहीही काम तत्कालीन सरकारने केले नाही. त्यामुळे कलाकारांना तेव्हा मदत मिळु शकलेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळेच आता आपण राज्यातील कलाकारांचा डेटाबेस तयार करण्याच्या सुचना विभागाला दिल्या आहेत. असे सुधीर मुनगंटीवार हयांनी सांगितले. ग्रामिण शाहीर कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातुन मनोरंजन करीत जनजागृती व समाजप्रबोधन करीत असतो. आज या कलावंतांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी भारतीय कलाकार शाहीर मंडळ व महाराष्ट्र शाहीर परिषदने विधानभवनावर मोर्चा काढला. शाहीर व कलावंतांनी वेशभुषेसह आपल्या पारंपारिक नृत्य सादर केले. वृद्ध कलावंतांच्या मानधन १०,००० रूपये करण्यात यावे. जिल्हा मानधन समिती मध्ये १०० अर्ज बैठकीत पात्र करतात ते ३०० करण्यात यावे, मानधन वय ५० वर्ष आहे, ते ४० वर्ष करण्यात यावे, लोक कलावंतांना आरोग्य सेवा मोफत करण्यात यावी, उत्पन्नाची मर्यादा ५० हजारावरून २ लाख रुपये करण्यात यावी, कलावंत यांना १०,००,००० रूपया पर्यंत विमा काढावा, कलावंतांना शासना तर्फे ओळखपत्र देण्यात यावे, अश्या २१ मागण्याचे निवेदन मुनगंटीवार यांना देण्यात आले.

शिष्टमंडळात महाराष्ट्र शाहिर परिषदेचे हितचिंतक भारतीय कलाकार शाहीर मंडळ आणि महाराष्ट्र शाहिर परिषदेचे पदाधिकारी शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे, डॉ संजय बजाज, भगवान लांजेवार, कवी ज्ञानेश्वर वांढरे, अंबादास नागदेवे, नरहरी वासनिक, दीपमाला मालेकर, गणेश देशमुख, वसंता कुंभरे, अरूण मेश्राम, चिरकुट पुंडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्यासह काही प्रमुख अधिकारी ही उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या