कांद्री येथे हरिनाम भागवत सप्ताहाने श्री दत्तात्रैय जयंती महोत्सव थाटात संपन्न
ठिक ठिकाणी महाराजांच्या पालखीचे नागरिकांनी केली पुजा अर्चना आणि प्रसाद वाटप
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान :- कांद्री – कन्हान परिसरातील श्री दत्त मंदिरात श्री दत्तात्रैय जयंती महोत्सव श्रीमद भागवत पारायण, हरिपाठ, काकडा भजन , रामायण पाठ , हरिभजन व पालखी मिरवणुकी सह आदि विविध कार्यक्रमाने श्री दत्तात्रैय जयंती सोहळा साजरा करण्यात आला . मार्गशिर्ष शुक्ल पक्ष ८ गुरुवार (दि.१) डिसेंबर २०२२ ला कांद्री येथे श्री दत्त मंदिरात दुपारी १२ वाजता घटस्थापना करण्यात आली . दररोज सकाळी ज्योत ६ ते ७ , काकडा भजन दुपारी १२.३० ते २.३०, रामायण पाठ महिला मंडळ कांद्री तर्फे करण्यात आले . दररोज सायंकाळी ४ ते ६ श्रीमद भागवत पारायण कथा सादरकर्ते ह.भ.प. सौ. कल्पनाताई विजयजी देशमुख , हरिपाठ हरिभजन अरुणोदय भजन मंडळ कांद्री , दुर्गा भजन मंडळ, गुरूदेव भजन मंडळ कांद्री , दुर्गा जस भजन मंडळ टेकाडी , दुर्गा भजन मंडळ , श्री दत्त भजन मंडळ कांद्री , विठ्ठल रुख्मिनी भजन मंडळ टेकाडी व श्री गजानन महाराज भजन मंडळ कांद्री श्री विक्रमजी वांढरे व संच जागृती हरिभजन कांद्री व्दारे भजन किर्तन करण्यात आले .
बुधवार (दि.७) ला श्री दत्तात्रैय जयंती दिनी सकाळी ७.३० वाजता श्री दत्तात्रेय महाराजांची पालखी नगर भ्रमण करून ठिक ठिकाणी पालखी ची पुजा अर्चना करून फुलाच्या वर्षाने , अल्पोहार , चहा, कांफी, फळ वाटप करुन पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले .पालखी दुपारी परत मंदिरात पोहचुन समारोप करण्यात आला .
गुरुवार (दि.८) २०२२ ला सकाळी ८ ते ११.३० पर्यत श्री दत्तात्रैय मुर्तीचा अभिषेक , हवन दुपारी १२.३० ते ३.३० पर्यंत हभप. मारोतराव जान भोर महाराज मु. बेरडी ता. सौंसर यांचे गोपाल काल्याचे किर्तन सांयकाळी ४ ते १० पर्यंत महाप्रसाद वितरण करुन श्री दत्तात्रैय जयंती सोहळा साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री दत्त मंदिर भाविक मंच कमेटी कांद्री चे कवडुजी आकरे , शोभाताई वझे , नरेश पोटभरे , योगेंद्र आकरे , वामन देशमुख , शिवाजी चकोले, मारोतराव कुंभलकर , गणेश भक्ते, बंटी आकरे , रामाजी हिवरकर , गणेश हटवार , किशोर निमपुरे , रामचंद हटवार , बाळा सरोदे , जितु आकरे, बंडु बावनकुळे , प्रदीप सरोदे , हिराबाई बंजारी, वंदना पोटभरे, मालाताई भक्ते , इंदिरा पारधी , इंदिरा कुंभलकर , छाया हटवार , आशाताई हटवार सह आदी नागरिकांनी , महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले .
0 टिप्पण्या