Advertisement

कन्हान - पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षाने केले साखळी उपोषण

कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षाने केले साखळी उपोषण

दुसऱ्या दिवशी माजी मंत्री सुनील केदार , माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिली भेट

११० पेक्षा जास्त लोकांनी साखळी उपोषणाला भेट देऊन केले समर्थन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लीवर लीमिटेड ची संपूर्ण 18.78 एकड़ जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्य आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटने च्या वतीने गुरुवार दिनांक २२ डिसेंबर पासुन रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय समोर साख़ळी उपोषण सुरू करण्यात आले आहे .

शुक्रवार दिनांक (दि२३) डिसेंबर ला दुसऱ्या दिवशी कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष मा.योगेंद्र रंगारी , गट नेता नगरसेवक मनिष भिवगडे , नगरसेविका रेखा टोहणे , गुंफा तिडके , पुष्पा कावडकर या पाच लोकांन व्दारे साखळी उपोषण करण्यात आले . या साखळी उपोषणा च्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री मा.सुनील बाबू केदार , माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मीताई बर्वे , काँग्रेस नेता मा.चंद्रपालजी चौकसे , काँग्रेस कमेटी जिल्हा उपाध्यक्ष मा.नरेश बर्वे , कांद्री ग्रामपंचायत सरपंच मा.बलवंत पडोळे , माजी उपसरपंच मा.श्यामकुमार बर्वे , काँग्रेस महिला आघाड़ी कमेटी कन्हान शहर अध्यक्ष सौ.रीता बर्वे , पंचायत समिति सभापती सौ.मंगलाताई निंबोने , उपसभापती सौ.करुणाताई भोवते यांचा सह विविध पक्षाचा , संघटने च्या ११० पेक्षा जास्त लोकांनी उपोषण स्थळाला भेट देऊन समर्थन दिले आहे .

आज शनिवार (दि २४) डिसेंबर ला शिंदे सेना कन्हान व युवा क्रांती संघटन च्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे .

या प्रसंगी नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , सतीश पाली , शरद वाटकर , शेखर बोरकर , सिंधु ढोके ,शक्ती पात्रे , प्रदीप बावने , अद्रीराम कनोजिया , लिलाधर बर्वे , साबिर शेख , शक्ति पात्रे , सूर्यभान ढोके , राहुल किरपान , विनोद किरपान , अभिजीत चांदुरकर , आकिब सिद्दीकी , मयूर माटे , महेश धोगड़े , सुरेश कळंबे , शैलेश कड़बे , प्रशील सुखदेवे , राजा संभोजी , नरेश चिमनकर , प्रणाली रंगारी , प्रतीक्षा चवरे ,चिराल वैद्य , फिरोज शेख , प्रशांत पाटील , अमर मोहिते , विजय पारधी , प्रदीप गायकवाड सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या